Big Blow To Mumbai Indians After The Defeat From Lucknow Super Giants ; मुंबईला पराभवानंतर बसला अजून एक मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसल्याचे आता समोर आले आहे. सामान संपला आणि त्यानंतर मुंबईच्या संघाला हा धक्का बसला.मुंबई इंडियन्सला मंगळवारी आयपीएल टी-२० स्पर्धेच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर पार पडलेल्या लढतीत यजमान लखनऊ सुपर जायन्ट्सने चुरशीच्या लढतीत मुंबईवर ५ धावांनी विजय मिळवला. १७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने २ बाद १०३ अशा सुरुवात केली होती, पण सूर्यकुमार यादव (७) अपयशी ठरला अन् मुंबईने पराभव ओढवून घेतला. अखेरच्या षटकातही सामना मुंबईच्या हातात होता. विजयासाठी त्यांना ११ धावा करायच्या होत्या, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले आणि त्याचाच फटका त्यांना आता बसला आहे.

लखनौच्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ सामने खेळला आहे. या १२ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सात सामने जिंकले आहेत, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सात विजयांसह मुंबईच्या संघाचे आता १४ गुण झाले आहेत आणि त्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. जर त्यांना विजय मिळवता आला असता तर त्यांना दोन गुण मिळाले असते आणि त्यांचे १६ गुण होऊ शकले असते. पण त्यांचा पराभव झाला आणि त्यांची गुणतालिकेत घसरण झाली. यापूर्वी मुंबईचा संघ हा तिसऱ्या स्थानावर होता. पण या पराभवानंतर लखनौच्या संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि मुंबईची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. हा मुंबईसाठी मोठा धक्का असेल.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

मुंबईच्या संघासाठी हा सामान करो या मरो असाच होता. कारण या सामन्यामध्ये त्यांचे आयपीएलचे भवितव्य ठरणार होते. कारण हा सामना जिंकून त्यांना बाद फेरीच्या दिशेने पोहोचता आले असते. प्ले ऑफच्या दिशेने त्यांना ठोस पाऊल टाकता आले असते. पण जर हा सामना त्यांनी गमावला असता तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकले असते.

[ad_2]

Related posts