After Defeat Mumbai Indians Still In IPL Playoffs Race Or Not, Know The Equation ; पराभवानंतर मुंबईचे आव्हान कायम आहे की नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : लखनौच्या महत्वाच्या सामन्यात मुंबईचा अवघ्या पाच धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पण या पराभवानंतर मुंबईचे आव्हान कायम आहे की नाही, याचे समीकरण आता समोर आले आहे.या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेतही धक्का बसला. कारण या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि लखनौने दोन गुणांची कमाई केली. लखनौचा संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. विजयासह त्यांनी मुंबईच्या संघाला धक्का दिला आणि त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता मुंबईचा एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही परीस्थिती त्यांना हा अखेरचा सामना जिंकावा लागेल. मुंबईने जर हा सामना जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील. पण १६ गुणांसह त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाने जरी अखेरच्या सामन्यांत विजय मिळवला तरी त्यांना अन्य संघांची कशी कामगिरी होते, हे पाहावे लागेल. त्यामुळे अखेरचा सामना जिंकणे आणि अन्य संघाची कामगिरी यावर मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो. पण जर मुंबईला अखेरच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही तर त्यांच्यासाठी प्ले ऑफचे गणित अजून कठीण होऊ शकते. त्यामुळे अखेरच्या सामन्यांत त्यांनी मोठा विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. कारण विजयाबरोबर मुंबईच्या संघाला चांगला रनरेटही ठेवावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना फक्त विजय मिळवून चालणार नाही तर त्यांना मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर अन्य सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, आरसीबी, लखनौ सुपर जायंट्स यांच्या अखेरच्या सामन्यांमध्ये नेमकं काय घडतं या गोष्टींवरही त्यांना लक्ष ठेवावे लागेल.

प्रथम फलंदाजी करताना लखनौने मार्कस स्टॉइनिसच्या तडाखेबंद ८९ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ५८ चेंडूंत ९० धावांची सलामी दिली. दहाव्या षटकात रवी बिश्णोईने रोहितला बाद करून ही जोडी फोडली. रोहितेने २५ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर ईशान किशनलाही रवीनेच बाद केले. ईशानने ३९ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह ५९ धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव सात, नेहल वधेरा सोळा धावांची, तर विष्णू विनोद दोन धावांची भर घालून परतला. अखेरच्या टप्प्यात टिम डेव्हिडने फटकेबाजी करून आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, अखेरीस मुंबईला १७२ धावाच करता आल्या.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

मुंबईच्या संघाने १७८ धावांचा पाठलाग करताना ९० धावांची सलामी दिली होती, पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

[ad_2]

Related posts