Chhagan Bhujbal : लोकसभेवरून राजकारण तापलेले असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोनद्वारे रेकी? पोलीस बंदोबस्त वाढवला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhagan Bhujbal : नाशिक येथून लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यास इच्छुक असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म (Bhujbal Farm) या निवासस्थानावर ड्रोन (Drone) कॅमेरा फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ड्रोन उडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत भुजबळ फार्मवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांकडून भुजबळ फार्मची पाहणी करण्यात आली आहे. भुजबळ फार्मबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

ड्रोन कोणी आणि का उडविला? याचे कारण गुलदस्त्यात

ड्रोन कोणी आणि का उडविला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ड्रोन उडविण्यासाठी कोणी परवानगी घेतली होती का? याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून वातावरण तापले असतानाच भुजबळ यांच्या बंगल्यावर ड्रोन उडाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

छगन भुजबळांची उमेदवारी उद्या जाहीर होणार? 

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात आहे. आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Lok Sabha Constituency) जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळांच्या उमेदवारीबाबत उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. 

भुजबळांना मराठा समाजाचा विरोध 

छगन भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. भुजबळांनी मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठ्यांना डिवचण्याचे काम करत आहेत. यामुळे महायुतीला 48 मतदारसंघात याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार, असेही सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Babanrao Gholap : मिलिंद नार्वेकरांवर हल्लाबोल करत बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, आजच शिंदे गटात प्रवेश करणार?

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts