Shiv Sena Shrikant Shinde candidature announced by Devendra Fadnavis affect on opposition of BJP kalyan lok sabha election maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाणे : अखेर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जाहीर केली. कल्याणची सुभेदारी भाजपला मिळणार की मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार याबद्दल उठत असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र थेट भाजपच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्याने या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना असलेला भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध मावळला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदेंना विरोध

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपनेच उमेदवार द्यावा अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. जर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर भाजपचे कार्यकर्ते काम करणार नाहीत असा ठरावच त्यांनी मंजूर केला होता. या विरोधाला किनार होती ती मागील महिन्यात झालेल्या गणपत गायकवाड प्रकरणाची.

गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये असताना श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते जाणार अशी चर्चा असतानाच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच 24 तासांच्या आत सर्व विरोध शांत केला. 

श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं

आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र कल्याणची जागा पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ठाण्याप्रमाणेच कल्याणची जागा भाजप स्वतःकडे मागत आहे का? कल्याणची जागा भाजपला देऊन ठाण्याची जागा स्वतःकडे ठेवण्यात येणार आहे का? कल्याणच्या जागेवर दुसराच उमेदवार असणार आहे का? अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र श्रीकांत शिंदे इतके दिवस शांत होते. अखेर आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपले मौन सोडलं. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्यानंतर शिंदे गटाकडून देखील या संदर्भात महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. महायुतीचा धर्म सर्वच पक्षांनी पाळायला हवा आणि जरी काही विरोध असेल तरी तो त्या पक्षाचे वरिष्ठ नेते दूर करतील असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला. 

कल्याणमध्ये भाजपचे तीन आमदार

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा ठाणे महानगरपालिकेतील कळवा, मुंब्रा, दिवा या भागापासून सुरू होतो ते थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकापासून अंबरनाथपर्यंत थांबतो. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, मनसेचे राजू पाटील, भाजपाचे रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड आणि कुमार आयलानी, शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर हे आमदार आहेत. 

भाजपचे तीन आमदार इथे असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत होते. मधल्या काळात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेतल्या. त्यामुळेच कल्याणमधून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार चर्चा सुरू होती. 

आता मात्र खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आज श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केल्यामुळे सर्व चर्चा संपल्या आहेत. भाजपच्या सर्व नेत्यांनी देखील श्रीकांत शिंदे यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. 

शिंदेंच्या विरोधात वैशाली दरेकर रिंगणात

मधल्या काळात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावरून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात अनेक वेळेस टीका केल्याने मनसेकडून राजू पाटील देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. मात्र याही चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याने श्रीकांत शिंदे विरोधात महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांची लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला कल्याण लोकसभा मतदारसंघातूनच सुरुवात केली होती. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे गटाकडून बलाढ्य उमेदवार दिला जाणार ही शक्यता होती. मात्र सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई आणि केदार दिघे या तिघांनी देखील असमर्थता दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच अखेर ही माळ वैशाली दरेकर यांच्या गळ्यात पडली आहे. आता ही लढत चुरशीची होणार की एकतर्फी होणार हे येणाऱ्या दोन महिन्यात स्पष्ट होईल. 

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts