ipl 2024 mumbai indians vs delhi capitals match preview all you need to know Mi vs DC match preview suryakumar yadav hardik pandya pant marathii news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs DC, IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली (mumbai indians vs delhi capitals ) विजयाची गाडी पटरीवर आणण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईला अद्याप पहिल्या विजयाची प्रतिक्षाच आहे. तर दुसरीकडे दिल्लीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे, त्यामुळे दिल्लीकडूनही विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. आज आयपीएलमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना दुपारी तीन वाजता वानखेडे मैदानावर होणार आहे. 

सूर्यकुमार यादव परतल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे. पण दुखापतीमधून कमबॅक करणाऱ्या सूर्याला सूर गवसणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. दुसरीकडे दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार दुखापतीमधून 100 टक्के तंदुरुस्त झालेले नाहीत. त्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. दिल्ली आणि मुंबईची गुणतालिकेतील स्थिती जवळपास सारखीच आहे. दिल्ली नवव्या तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबई संघाला आयपीएलमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अनिवार्य आहे, त्यामुळे आजचा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. 

सूर्याच्या कामगिरीकडे लक्ष – 

मिस्टर 360, स्कॉय अर्थात आपला सूर्यकुमार यादव आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दुखापतीनंतर तो आयपीएलमध्ये कमबॅक करतोय. एनसीएकडून सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर सोशल मीडियावर मुंबईच्या चाहत्यांकडून सेलेब्रेशन करण्यात येत आहे. आजच्या सामन्यात सूर्या कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांच्या नजरा असतीलच. दुखापतीमुळे तीन महिने सूर्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यामुळे सूर्याला पहिल्या सामन्यात लय मिळणार का? सूर्याच्या कमबॅकनंतर कुणाचा पत्ता कट होणार? हे काही वेळात स्पष्ट होईल. 

मुंबईच्या संघाने आतपर्यंत निराशानजक कामगिरी केली आहे. फंलदाजी आणि गोलंदाजीत मुंबई अपयशी ठरली आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, नमन धीर यांना धावा जमवता आल्या नाही. चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. दुसरीकडे गोलंदाजीतही मुंबईची कामगिरी खराब राहिली आहे. आकाश मधवालचा अपवाद वगळता इतरांना विकेट घेता आल्या नाहीत. स्वत: हार्दिक पांड्यालाही गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये हवं तसं योगदान देता आलं नाही. 

ऋषभ फॉर्मात परतला, पण …. 

दुखापतीनंतर मैदानात कमबॅक करणारा ऋषभ पंत सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यानं मागील दोन्ही सामन्यात शानदार अर्धशतके ठोकली आहे. पंत फॉर्मात परतला, पण त्याला इतर फंलदाजांकडून साथ मिळत नाही. डेविड वॉर्नर, मिचेल मार्श या अनुभवी फलंदाजांकडून साथ मिळत नाही. मागील सामन्यात पृथ्वी शॉ यानं दिमाखात सुरुवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. वानखेडे स्टेडियमवर पृथ्वी शॉ याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याशिवाय डेविड वॉर्नर याच्याकडून स्फोटक फंलदाजाची अपेक्षा दिल्लीकरांना असेल. 

मागील सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. कोलकात्याविरोधात दिल्लीच्या गोलंदाजांनी 272 धावांची लूट केली होती. मुंबईविरोधात दिल्लीचे गोलंदाज कमबॅक करतीलच. पण मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांची फिटनेस दिल्लीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 

दिल्लीचे शिलेदार कोणते ?

अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल, कुमार कुशगरा ,झाय रिचर्डसन,हॅरी ब्रूक,सुमित कुमार,शाय होप,ट्रिस्टन स्टब्स, राशीख दर, रिकी भूई ,स्वस्तिक चिकारा  
 
मुंबईच्या संघात कोण ?

आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड , शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी,नुवान तुषारा,दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी,श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज,शिवालीक शर्मा  



[ad_2]

Related posts