ipl2024 lsg vs gt toss update lucknow super giants won the toss decided to bat first against gujarat titans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ: आयपीएलमध्ये (IPL 2024) आज लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात लढत होत आहे. यंदाच्या आयपीएलमधील ही २१ वी लढत  आहे. लखनौ आणि गुजरात यांच्यातील मॅच लखनौच्या मैदानावर होणार आहे. याचा फायदा के.एल. राहुल (K.L. Rahul) याच्या टीमला होण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सला यापूर्वीच्या मॅचमध्ये होम ग्राऊंडवर सनरायजर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता गुजरात टायटन्स लखनौ विरुद्ध भिडणार आहे. दुसरीकडे पहिल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर लखनौनं दमदार कमबॅक केलं आहे. लखनौनं तीन पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. के.एल. राहुलची टीम आज विजय मिळवते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लखनौनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात आणि लखनौचा गुणतालिकेच्या दृष्टीनं विचार केला असता के.एल.  राहुलच्या नेतृत्त्वातील टीम चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वातील गुजरात टायटन्स चार पैकी दोन मॅचमध्ये विजयासह चार गुणांसह नेट रनरेट कमी असल्या कारणानं सातव्या स्थानावर आहे. 

लखनौ आणि गुजरात टायटन्स यांच्यात यापूर्वी झालेल्या चार मॅचमध्ये गुजरातचं वर्चस्व राहिलं आहे. गुजरातनं चारही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. के.एल. राहुलच्या नेतृत्त्वातील टीम आजच्या मॅचमध्ये हे चित्र बदलण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरेल. लखनौनं पहिल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध  पराभव स्वीकारल्यानंतर कमबॅक केलं आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा लखनौनं पराभव केला आहे. 

गुजरात टायटन्सचा विचार केला असता त्यांनी मुंबई इंडियन्सला पराभूत करत विजयानं यंदाच्या आयपीएलची चांगली सुरुवात केली होती. गुजरातला त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. पुढे सनरायजर्स हैदराबादला त्यांनी पराभूत करुन कमबॅक केलं होतं. गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जनं त्यांचा धक्कादायक पराभव केला. 

मयंक यादवचं गुजरात टायटन्स पुढं आव्हान

लखनौ सुपर जाएंटसचा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं त्याच्या वेगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं सर्वाधिक वेगानं गोलंदाजी केलेली आहे. त्यानं दोन मॅचेसमध्ये सहा विकेट घेतलेल्या आहेत.आज मयंक यादव गुजरातच्या टॉप  ऑर्डरपुढं किती प्रभावीपणे मारा करतो यावर लखनौचं भवितव्य अलंबवून असेल. 

गुजरात टायटन्सची टीम:
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कॅप्टन), केन विलियम्सन, साई सुदर्शन, विजय शंकर, मोहित शर्मा,आझमतुल्लाह ओमरझाई, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नाळकंडे 

लखनौ सुपर जाएंटसची टीम :
क्विंटन डी कॉक, के.एल. राहुल (विकेटकीपर, कॅप्टन) देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवि बिष्णोई, यश ठाकूर, नवीन उल हक, मयंक यादव

संबंधित बातम्या:

IPl 2024 MI vs DC : रोहित, इशान अन् हार्दिकनंतर डेव्हिडसह शेफर्डची फटकेबाजी, मुंबईचा दिल्लीपुढं 234 धावांचा डोंगर

IPl 2024 Suryakuamar Yadav : सूर्यकुमार यादव आला तसा माघारी गेला, रिषभ पंतची रणनीती यशस्वी, मुंबईच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts