ipl gt vs lsg lucknow super giants ravi bishnoi takes catch of kane williamson gujarat titans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ: आयपीएलमध्ये (IPL 2024)  सुपर संडेमध्ये आज दोन मॅच पार पडल्या. पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअर डेविल्स यांच्यात पार पडली. तर, दुसरी मॅच लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात झाली. दोन्ही मॅचमध्ये एक समान गोष्ट म्हणजे पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केलं. तर लखनौ सुपर जाएंटसनं गुजरात टायटन्सला 33 धावांनी पराभूत करुन दाखवलं. लखनौ सुपर जाएंटसच्या गोलदाजांनी केलेल्या कामगिरीमुळं गुजरातला पराभव स्वीकारावा लागला. 

लखनौ सुपर जाएंटसनं गुजरात टायटन्सला आज पहिल्यांदा पराभूत केलं. लखनौचे बॉलर्स यश ठाकूर, कृणाल पांड्या, रवि बिष्णोई आणि नवीन उल हक यांनी गुजरातच्या 10 विकेट घेतल्या. लखनौ सुपर जाएंटसचा प्रमुख गोलंदाज मयंक यादव जखमी झाल्यानं त्यानं केवळ एक ओव्हर टाकली. 

रवि बिश्नोईची (Ravi Bishnoi) हवेत उडी, विलियमन्सन पॅव्हेलियनमध्ये

लखनौला पहिली विकेट यश ठाकूरनं मिळवून दिली.  यश ठाकूरनं शुभमन गिलला 19 धावांवर बाद केलं. यानंतर मैदानात आलेल्या  केन विलियमन्सनला रवि बिश्नोईनं बाद केलं. रवि बिश्नोईनं हवेत उडी मारुन कॅच घेत विलियमन्सनला बाद केलं. बिश्नोईच्या या कॅचचं सर्वत्र कौतुक होत आहे. आयपीएलच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.     

पाहा व्हिडीओ

गुजरातनं अभ्यास केला मयंक यादवचा पेपर आला यश ठाकूरचा

गुजरात टायटन्सनं लखनौनं दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली होती. लखनौ सुपर जाएंटसच्या यश ठाकूरनं गुजरातच्या 54 धावा झालेल्या असताना शुभमन गिलला 19 धावांवर बाद केलं. यानंतर गुजरातच्या विकेटची मालिका सुरु झाली. यश ठाकूरनं आजच्या मॅचमध्ये पाच विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. यश ठाकूरनं शुभमन गिल, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान आणि नूर अहमदला बाद केलं. मयंक यादव  जखमी झाल्यानं एकच ओव्हर टाकू शकला. यश ठाकूरनं चार ओव्हरमध्ये 30 धावा देत 5 विकेट घेतल्या. 

गुजरातचा तिसरा पराभव

गुजरात टायटन्सनं 2022 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये गुजरातनं उपविजेतेपद पटकावलं होतं. या हंगामामध्ये गुजरातच्या नावावर तीन पराभवांची आणि दोन विजयांची नोंद झाली आहे.  

संबंधित बातम्या :

IPl 2024 Romario Shepherd : 4,6,6,6,4,6 शेफर्डच्या वादळात नॉर्खियाचा पालापाचोळा, पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचे पैसे फिटले

LSG vs GT Toss Update : लखनौनं होम ग्राऊंडवर टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करणार, गुजरात कमबॅक करणार?

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts