Mahayuti Seat Shearing Dispute Kripal Tumane criticizes BJP in front of CM Eknath Shinde In Nagpur Ramtek Lok Sabha Constituency Lok Sabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : गेली अनेक वर्षे निवडणूक लढवणारे मतदारसंघ शिंदेसेनेकडून महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Shearing)  मित्रपक्षांच्या ताब्यात गेले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत मोठी नाराजी आहे. विशेष म्हणजे आपली नाराजी नेतेमंडळी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर थेटपणे मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रामटेकचे लोकसभा मतदारसंघातून (Ramtek Lok Sabha Constituency) तिकीट कटल्याने दुखावलेले शिंदेसेनेचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी देखील मुख्यमंत्र्यांसमोर आपलं दुःख मांडत थेट भाजपवर (BJP) बाण सोडले आहेत. रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

दरम्यान यावेळी आपल्या भाषणात बोलतांना कृपाल तुमाने म्हणाले की, “मागील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आपण याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकली होती. मात्र, तुमच्याकडे लोकं नाहीत, संघटना नाही असे यावेळी काही लोकांनी साहेबांना सांगितले. तसेच तुमाने हे घरातच बसले असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांना सांगण्यात आले. पण, काँग्रेसचे केंद्रीय नेते असलेल्या मुकुल वासनिक यांचा पराभव करून मी निवडून आलो होतो. यावेळी तर स्पर्धाच नव्हती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मी एक लाखावर मतांनी निवडून आलो असतो,” असे म्हणत कृपाल तुमाने यांनी भाजपवर निशाणा साधला. 

साहेबांवर दबाव होता…

दरम्यान, सर्व काही घडत असतांना मी हे सर्व पाहत होतो. साहेब माझ्यासाठी शेवटपर्यंत लढत होते. मात्र, त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे मी मागे हटलो. पक्षासाठी काम करा असे साहेब म्हणाले. मनात दुःख होते; पण मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहीन, असा शब्द साहेबांना दिला, असे म्हणत तुमाने यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. 

आमच्यासोबत राहून लोकं मोठे होतात, नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात

शिवसेनेच्या मेळाव्यात तुमाने दाखल होताच्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर भाषण देण्यासाठी तुमाने उठताच सभागृहात पुन्हा घोषणा सुरु झाल्या. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून तुमाने यांनी देखील भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आपलं मन मोकळ केलं, “लोक आमच्या सोबत राहतात. मजबूत होतात व नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात. त्यामुळे आमचा पक्ष डाऊन होतो. साहेबांच्या मनात काय होते, हे मला माहीत आहे, असे म्हणत तुमाने यांनी एकामागून एक बाण भाजपवर सोडल्याचे पाहायला मिळाले. 

शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी…

कुठे भाजपच्या सर्वेचा संदर्भ, तर कुठे स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध पाहता शिंदेसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी शिवसेनेच्या नेहमीच्या जागा मित्रपक्षांकडे गेल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत अनेक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, आपण उठाव केल्यानेच भाजप पक्षाला सत्तेत बसला आहे. पण आता त्यांच्या दबावाला किती बळी पडायचं? असा सवाल देखील काही नेत्यांनी उपस्थित केल्याची माहिती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

CM Eknath Shinde : घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणे आम्हाला जमत नाही; आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts