Lizaad Williams has replaced Harry Brook in Delhi Capitals for IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DC, IPL 2024 : ऋषभ पंतच्या कमबॅकनंतरही दिल्लीला यंदाच्या हंगामात प्रभावी कामगिरी करता आली नाही. दिल्लीला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला. चार पराभव स्विकारणाऱ्या दिल्लीसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीने हॅरी ब्रूकच्या रिप्लेसमेंटची (Harry Brook IPL 2024) घोषणा केली आहे. लिझाद विल्यम्स हा ( Lizaad Williams Delhi Capitals ) दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू दिल्लीसोबत लवकरच जोडला जाणार आहे. आयपीएल आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने ट्विटवर अधिकृत माहिती दिली आहे. 

दिल्लीला वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून 29 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा हा यंदाच्या हंगाातील चौथा पराभव ठरला. दिल्लीची फलंदाजी आणि डेथ षटकातील गोलंदाजी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यासाठीच आता दिल्लीने नवा डाव खेळला आहे. हॅरी ब्रुक याच्या जागी रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. हॅरी ब्रूक यानं खासगी कारण देत आयपीएल 2024 मधून माघार घेतली होती. आता त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूची वर्णी लागली आहे. तो लवकरच दिल्लीसोबत जोडला जाणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लिझाद विल्यम्स हा लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे, दिल्ली संघाने याबाबत अधिकृत माहिती दिली. अष्टपैलू लिझाद विल्यम्स हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाकडून 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. लिझाद उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करत तर, उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 371 धावा चोपल्या आहेत. तर 16 बळी घेतले आहेत. लिझादच्या आगमानामुळे दिल्लीची कागदावरील ताकद नक्कीच वाढणार आहे.  पण लिझाद कशी कामगिरी करतो? याकडेही नजरा लागतील.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts