Devendra Fadnavis on Eknath Khadse will join BJP again Nagpur Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis on Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे येत्या 15 दिवसात पुन्हा भाजपमध्ये (BJP) घरवापसी करणार असल्याची माहिती त्यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना दिली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजप हे माझे घर आहे. भाजपच्या पायाधरणीपासून मी पक्षात राहिलो आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये (BJP) काम केले आहे. काही नाराजीमुळे मी भाजपमधून बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाली आहे. त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.  

मोदींवर विश्वास ठेऊन कुणीही प्रवेश करत असल्यास स्वागत

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजपच्या घरवापसीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विश्वास ठेऊन कोणीही प्रवेश करत असेल तर त्यांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्यामुळे अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवले नाही. अधिकृतरित्या पक्ष आम्हाला ज्या वेळेस कळवेल त्यावेळेस आम्ही त्यांचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर काय म्हणाले गिरीश महाजन?

एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. खडसेंचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही. त्यांचा प्रवेश असा खालती होणार नाही. मुंबईत होणार नाही असं ते म्हणतात. माझा प्रवेश दिल्लीत आहे, माझ्या सगळ्या ओळखी आहेत, असे ते म्हणतात. ते फार मोठे आहेत. त्यांच्याविषयी फार बोलणं संयुक्तिक नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.  

एकनाथ खडसेंची घरवापसी, कन्या मात्र शरद पवारांसोबतच

एकीकडे एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या मात्र शरद पवार गटातच राहण्यावर ठाम आहेत. मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच … लढ़ेंगे और जीतेंगे, असे रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाची घोषणा, कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

गावची ग्रामपंचायत राखता आली नाही, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा, गिरीश महाजनांचा हल्लाबोल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts