Prakash Shendge Slams Manoj Jarange Patil warned Chhagan Bhujbal about candidature for Nashik Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakash Shendge on Manoj Jarange Patil : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहूद्या, मग सांगतो, असा इशारा दिला आहे. यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. 

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा सुरू असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक लढत झाली होती. छगन भुजबळ नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक लोकसभेत (Lok Sabha Election 2024) जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असे म्हटले होते. 

तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 उमेदवार पाडू

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रकाश शेंडगे म्हणाले की, आम्ही सर्व जण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पाठीमागे उभे राहू.  त्यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगेंकडून होत आहे. मात्र, तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.  नाशिकमध्ये (Nashik) आम्ही सर्व जण प्रचारात उतरु.  संख्येच्या गणितानं बघितलं तर छगन भुजबळ यांना पाडणं अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे

ते पुढे म्हणाले की, आता हे जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे.  आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल यासंदर्भात आमची लढाई नाही.  आमची लढाई ही आरक्षणाची (Reservation) आहे.  आरक्षणाचे तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत.  ईव्हीएम (EVM) हॅक होऊ शकते, असे अनेकदा सिद्ध झालंय. व्हीव्हीपॅटचे ट्रेल मिळावेत यासंदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत, असे देखील प्रकाश शेंडगेंनी म्हटले आहे.  

मनोज जरांगे पाटील आज नाशिकमध्ये 

सकल मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध होत असतानाच मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील आज नाशिकमधून नेमकं काय बोलणार? नाशिकमध्ये मराठा समाजाकडून उमेदवार देणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : लोकसभेवरून राजकारण तापलेले असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोनद्वारे रेकी? पोलीस बंदोबस्त वाढवला

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts