CSK vs KKR: Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 7 wickets in a low-scoring match.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: IPL Marathi News: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 7 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम खेळताना 137 धावा केल्या होत्या, दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी एका बाजूला विकेट्स रोखून ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला धावफलक सुरू ठेवला. चेन्नईने 18 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 67 धावांच्या नाबाद अर्धशतकाने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरने आयपीएल 2024 च्या या हंगामात सलग 3 विजय नोंदवले होते, परंतु चेन्नई केकेआरच हा विजयरथ रोखला आणि  या हंगामात त्यांना पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. तर चेन्नईने सलग 2 पराभवानंतर केकेआरविरुद्ध आजचा सामना जिंकला.

चेन्नईच्या विजयात रचिन रवींद्रने 15 आणि डॅरिल मिचेलने 25 धावांचे योगदान दिले. चेन्नईने पहिल्या 10 षटकात 1 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांना विजय मिळवणे खूप सोपे झाले. कारण संघाला शेवटच्या 10 षटकात 57 धावा हव्या होत्या आणि त्यांच्या 9 विकेट्स शिल्लक होत्या. 13व्या षटकात मिचेल बाद झाला असला तरी त्यानंतर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने दरवेळप्रमाणेच तुफानी शैलीत फलंदाजी करत सामना एकतर्फी केला. शिवम दुबेने 18 चेंडूत 28 धावांच्या स्फोटक खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. केकेआरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले सुनील नरेन आणि वैभव अरोरा यांच्याशिवाय केकेआरच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.

ऋतुराज गायकवाड चमकला-

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद मिळाल्यानंतर रुतुराज गायकवाड फलंदाजीत खूप संघर्ष करत होता. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने 46 धावांची खेळी खेळली असली तरी उर्वरित 3 डावात तो फलंदाजीत काही खास दाखवू शकला नाही. आता कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संथ खेळपट्टीवर जबाबदारी स्वीकारत त्याने 58 चेंडूत 67 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली आहेत. या खेळीत त्याने 9 चौकार मारले.

संबंधित बातम्या:

Mumbai Indians Rohit Sharma: ‘हेच हवं आहे…’; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान

Romario Shepherd: दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo’s

IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts