Ravindra Jadeja teases the Chepauk Crowd by coming ahead of MS Dhoni ipl marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravindra Jadeja MS Dhoni : थलायवा धोनीला बॅटिंग करताना पाहण्यासाठी चेन्नईचे चाहते आतुर असतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये गर्दी करतात. कोलकात्याविरोधातही धोनी मैदानात उतरल्यानंतर चाहत्यांनी हल्लाबोल केला. पण धोनीच्या चाहत्यांची रवींद्र जाडेजानं फिरकी घेतली.कोलकात्याविरोधात चेन्नई विजयाच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळी शिवब दुबे बाद झाला. त्यानंतर धोनी फलंदाजीला येणार? असेच सर्वांना वाटलं. पण जड्डूने हातात बॅट घेत एन्ट्रीचं नाटक केले. 

रवींद्र जाडेजानं धोनीच्या चाहत्यांसोबत प्रँक केले. चेन्नईला विजयासाठी तीन धावांची गरज होती, त्यावेळी शिवम दुबे बाद झाला. सर्व चाहत्यांना धोनी येईल, अशी अपेक्षा होती. दुबे बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांकडून धोनी धोनी असे नारेबाजी सुरु झाली. धोनीच्या चाहत्यांची फिरकी घेण्यासाठी जाडेजा बॅट घेऊन मैदानात उतरण्यासाठी निघाला. तो सिमारेषाजवळ आला.. त्यानंतर चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जाडेजा पटकन माघारी फिरला.. जाडेजाचा हा ड्रामा पाहून शेजारी बसणाऱ्या चेन्नई्च्या खेळाडूंनाही हसू आवरलं नाही. रवींद्र जाडेजानं फिरकी घेतल्यानंतर पुढच्या काही सेकंदात धोनीनं मैदानात एन्ट्री केले. त्यानंतर चाहत्यांचा आवाज आणखी वाढला. धोनी फलंदाजी करत होता, त्यावेळी आवाज गरजत होता, कुणाला काही ऐकूही येत नव्हतं. फिल्डिंग करणाऱ्या रसेलने तर कानावार हात ठेवले होते. 

पाहा जाडेजाजा व्हिडीओ – 

जाडेजाला सामनावीर पुरस्कार –

कोलकात्याविरोधात भेदक मारा करणाऱ्या रवींद्र जाडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जाडेजाने चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याशिवाय महत्वाचे दोन झेलही घेतले. 

चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली – 

कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची (CSK) गाडी पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतली. कोलकात्यानं दिलेले 138 धावांचे आव्हान चेन्नईने (CSK vs KKR) सात विकेट राखून सहज पार केले. दुसरीकडे यंदाच्या हंगामात कोलकात्याचा पहिला पराभव झाला. कोलकात्यानं प्रथम फंलदाजी करताना 137 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकात्यानं दिलेले हे आव्हान चेन्नईने सहज पार केले. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं नाबाद अर्धशतक ठोकलं. धोनीने तीन चेंडूमध्ये एक धाव काढली.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts