Sangli loksabha Election Sangli Lok Sabha seat to Thackeray group Congress workers aggressive vishal patil news sangli 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sangli loksabha Election News : महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीचं (loksabha Election) जागावाटप आज जाहीर झालं. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागावाटप जाहीर केलं. मात्र, सांगली लोकसभेच्या (Sangli loksabha) जागेवरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. जसा वसंतदादाच्या पाठीत खंजिर खुपसला होता, तसाच खंजीर विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठीत खुपसला गेल्याच्या भावना काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत. ज्यांनी कुणी हे केलंय हे त्यांना परवडणारे नाही असे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेमका रोख कोणाकडं? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

वसंतदादा प्रेमी हाच आमचा गट 

सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. तिथून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते. मात्र, जागा ठाकरे गटाला सुटल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची निवडणूक लढवायचीच अशी भूमिका कार्यकर्ते घेताना दिसतायेत. जसा वसंतदादाच्या पाठीत खंजिर खुपसला होता, तसाच खंजीर विशाल पाटील यांच्या पाठीत खुपसला गेल्याच्या भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. ज्यांनी कुणी हे केलंय हे त्यांना परवडणारे नाही. आता वसंतदादा प्रेमी हाच आमचा गट असेल असे कार्यकर्त्यांनी म्हटलंय. विशाल पाटील जी भुमिका घेतील त्या भूमिका आम्ही पार पाडू असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं. दरम्यान, सांगलीच्या काँग्रेस भवनसमोर विशाल पाटील आगे बढोची  घोषणाबाजी सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचे संकेत!

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts