Zero Hour Sarita Kaushik MNS – Mahayuti Alliance Lok Sabha 2024 ABP Majha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour : राज ठाकरेंची महायुतीला साथ, मात्र विरोधकांची डोकेदुखी वाढली?
आतापर्यंत अनिश्चित भूमिकेचा पक्ष, अशी ओळख असलेल्या मनसेने यंदाच्या.. म्हणजेच २०२४ लोकसभा निवडणुकीत, मात्र  एक स्पष्ट भूमिका घेतलीय.. ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा’.. स्वत: राज ठाकरेंनी ही घोषणा केली… २०१४मध्ये मोदींना पाठिंबा, त्यांनतर २०१९मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदींविरोधातला प्रचार.. आणि आता पुन्हा मोदींना पाठिंबा.. भूमिका बदलली जरी असली, तरी स्पष्ट मात्र आहे. पण एका वाक्यात असलेली हि भूमिका बरीच पुढची प्रश्न अनुत्तरित ठेवून गेलीय..
 कालच्या सभेतून भलेही ‘आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको.. हा पाठिंबा फक्त नि फक्त, नरेंद्र मोदींसाठी आहे.’.. असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.. मनसे महायुतीत सामील झाली आहे की नाही?

[ad_2]

Related posts