MNS Sandeep Deshpande hits back after Munnabhai criticism on Raj Thackeray Shiv Sena Uddhav Thackeray Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज ठाकरे (Rajt Thackeray)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने जोरदार टीका केलीये त्यांच्या या टीकेला उत्तर देताना मनसे (MNS) नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) “चला आरश्यात बघूया” असं ट्वीट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या आरोप प्रत्याोपाराचे राजकारण सुरु झाले. 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भुमिका जाहीर केल्यानंतर  महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.  आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत  मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. आता संदिप देशपांडेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या मोदींना पाठींबा देणाऱ्या वक्तव्याचे जुने व्हिडीओ शेअर केले आहे. त्याला  चला आरश्यात बघूया असे कॅप्शन दिले आहे.

दर निवडणुकीला उद्धव ठाकरेंची बदलली भुमिका

संदीप देशपांडेनी उद्धव ठाकरेंचे 2009, 2014,2019 आणि 2022 मधील  काही वक्तव्य शेअर केले आहे. 2009 साली उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप चांगले आणि राष्ट्रवादीस काँग्रेस वाईट आहेत. 2014 साली म्हणाले, भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले. 2019 साली म्हणाले, विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस- राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी चांगले भाजप वाईट.  आता 2022 साली म्हणतात, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट. 

 

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा

मनसेने आता सोशल मीडियावरुन राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटावर  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि  संजय राऊत  यांच्यावर निशाणा साधला आहे.आता ठाकरे गटाकडून कोणते उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.  

हे ही वाचा :

हा राजकारणातील मुन्नाभाई! शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts