Dhairyasheel Mohite Patil meet sharad pawar possiblly joins ncp today madha lok sabha election maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघातले  (Madha Lok Sabha Election) नाराज धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले असून त्यांचा आजच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्याचवेळी धैर्यशील मोहिते पाटलांची माढ्यातून उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिल्यानंतर त्याला धैर्यशील मोहिते पाटलांनी विरोध केला होता. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण भाजपने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. 

रामराजे निंबाळकर काय भूमिका घेणार? 

धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थी प्रयत्न केले. मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायच ठरवलं असून ते माढ्यातून अर्ज भरणार आहेत. 

रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेल्या रामराजे निंबाळकरांनीही विरोध केला आहे. त्या दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर कुटुंबीयांच्या भेटीगाठी होत आहेत. या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेता हे देखील महत्वाच ठरणार आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts