[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Crime News : पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. गाड्या, सोनं, प्राणी यानंतर आता चक्क PMPML बस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सारसबाग परिसरात PMPL ची बस लावण्यात आली होती. सध्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे बस लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे पुलगेट आगाराची बस सारसबागेजवळ लावली. त्यानंतर ड्रायव्हरनं बसमध्येच चावी ठेवली, नेमकं हेच चोरानं पाहिलं आणि थेट बसच पळवून नेली. या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
बस चोरी केली आणि चोरानं बस मार्केट यार्ड परिसरात सोडली आणि चोर पसार झाला. त्यानंतर चोरानं बसमधील 5000 रुपयांची बॅटरी चोरून नेल्याचं उघडकीस आलं आहे. या संपूर्ण घडल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पालखी सोहळ्यामुळे पुलगेट परिसरात बसेस लावायला जागा उपलब्ध नसते, त्यामुळे अनेकदा बसेस स्वरगेट परिसरात लावण्यात येतात. त्याच प्रकारे ही बसदेखील काल लावण्यात आली होती. सोबत गाडीची चावीदेखील होती. हेच पाहून चोराने थेट बस चोरी केली. या घटनेची तक्रार देण्यात आली आणि सर्व आगारात खळबळदेखील उडाली.
900 ई-बस दाखल होणार
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येत्या काही महिन्यांमध्ये 900 ई-बस दाखल होणार आहेत. त्यामध्ये सात मीटर लांबीच्या 300 ई-बसेस तसेच संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या 300 बसेस आणि केंद्र सरकारकडून 300 बसेस अशा एकूण 900 बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. मेट्रो सेवा सुरू होईपर्यंत सात मीटरच्या 300 ई-बस पीएमपीच्या ताफ्यात येतील. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतून पीएमपीला 300 ई-बस मिळणार आहेत. तसेच, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या माध्यमातून 300 बसेस महामंडळास मिळणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कर्मचाऱ्यांना जुलैपासून 100 टक्के सातवं वेतन आयोग लागू
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू करण्यात आलेला 50 टक्के सातवा वेतन आयोग, येत्या जुलै 2023 पासून संपूर्ण लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगातील 50 टक्के फरकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरूवात होणार आहे. त्यासाठी महिन्याला चार कोटी रुपये लागणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PMPML Bus pass Student : विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंताच मिटली; PMPML देणार मोफत पास, कसा आणि कुठे मिळणार पास?
[ad_2]