MI vs RCB: RCB Captain Faf Du Plessis said We don’t have enough weapons in the bowling.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ विजयी मार्गावर परतला आहे. आयपीएलच्या 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bengaluru) 7 गडी राखून पराभव केला.

आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात 101 धावांची उत्कृष्ट आणि स्फोटक भागीदारी झाली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तर रोहितने 24 चेंडूत 38 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत मुंबई इंडियन्सचा विजय पक्का केला. सूर्यकुमारने 273 च्या स्ट्राइ्क रेटने फलंदाजी करत 19 चेंडूत 52 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 5 चौकार टोलावले.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर फाफ ड्यु प्लेसिस काय म्हणाला?

आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस संतप्त दिसत होता. या सामन्यातील पराभवामागील कारण सांगत चिंतादेखील त्याने व्यक्त केली. मुंबई इंडियन्सकडून झालेल्या दारूण पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघाची गोलंदाजी कमकुवत असल्याची कबुली दिली आहे. तो म्हणाला की त्याच्या गोलंदाजांकडे इतर संघांइतकी शस्त्रे नाहीत. कमकुवत गोलंदाजीमुळे आरसीबीच्या फलंदाजांना अधिक धावा करणे आवश्यक आहे, जेणेकरून विजयाची संधी मिळेल. फाफ पुढे म्हणाला, “गोलंदाजीच्या बाबतीत, आम्ही सुरुवातीला थोडे संथ होतो. आम्हाला पॉवरप्लेमध्येच विरोधी संघाच्या दोन-तीन विकेट्स झटपट काढण्याची रणनीती बनवावी लागेल. 

250 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील-

मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने 196 धावा केल्या, ज्या मुंबईने 27 चेंडू शिल्लक असताना सहज गाठल्या. यावर फॅफ म्हणाला, “सध्या असे दिसते की फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आम्हाला 250 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील, तरच आम्हाला जिंकण्याची संधी मिळेल. आमच्याकडे गोलंदाजीमध्ये इतकी शस्त्रे नाहीत. त्यांनी त्यांचा फॉर्म आणि आत्मविश्वास वापरणे महत्त्वाचे आहे. आम्ही जितक्या जास्त धावा करू तितक्या जास्त आम्हाला स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होईल.

फाफ डू प्लेसिसने मुंबईचे केले कौतुक-

तो म्हणाला, “मुंबईच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याला श्रेय द्यायला हवे. त्यांनी आमच्या गोलंदाजांवर खूप दबाव टाकला. विशेषत: पॉवरप्लेमध्ये त्यांनी आमच्या गोलंदाजांना खूप चुका करायला लावल्या.”

संबंधित बातम्या:

आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table

रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video

MI vs RCB IPL 2024: आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, मैदानात कोहलीला बॉलिंग देण्याची मागणी, विराटच्या रिॲक्शनची चर्चा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts