NCP Leader Sharad Pawar Meet BJP Leader Chandrarao Tawre in sanghavi baramati Loksabha Constituency

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सांगवी, बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत आपल्या राजकारणातील जुन्या विरोधकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलाय. बारामतीत काकडे विरुद्ध पवार असा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. त्या काकडे कुटुंबांना निंबूत या ठिकाणी जाऊन सांत्वन पर भेटीच्या निमित्ताने पवार यांनी संभाजी काकडेच्यां घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच थेट बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले आसताना एकेकाळचे वर्गमित्र असणारे चंद्रराव तावरे यांची भेट घेतली.  गेली 25 वर्ष विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपाचे ज्येष्ठ नेते माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यांचा शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे. यात कधी तावरेंकडे तर कधी पवार गटाकडे कारखान्याचे सूत्रे होती. आता अजित पवार यांच्या वर्चस्वाकडे माळेगाव कारखाना आहे. शरद पवार यांनी आज जेष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची देखील भेट घेतली. भेटीवेळी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते आणि बंद दाराआड साधारण 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यावेळी चंद्रराव तावरे यांनी शरद पवार हे आमच्या घरी आले नाहीत तर शेजारी राहणाऱ्या काकडे कुटुंबियांकडे सात्वनपर भेटीला आले होते. त्यानंतर आमची भेट झाली. या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रराव यांनी सांगितलं आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts