mahatma gandhis grandson tushar gandhi has allegations on vanchit bahujan aghadi of being b team of bjp prakash ambedkar Answered to gandhi maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakash Ambedkar On Tushar Gandhi : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी  (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम( MIM) ही भाजपची (BJP) बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू नका, असे आवाहन करत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी (Tushar gandhi) यांनी वंचितवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या खळबळजनक आरोंपाना आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) खरपूस समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच, पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणालाही नाकारणारे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणले आहेत. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून सडेतोड उत्तर 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही, असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. तुषार गांधी यांची कानउघडणी करताना आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला, हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ब्रिटिशांविरुद्ध उभारलेला लढा सर्वसमावेशक होता, मात्र… 

तुषार गांधी यांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या अज्ञानातून आलेले आहे. तुषार गांधी यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्या आजोबांनी ब्रिटिशाविरुद्ध जो लढा उभारला होता, तो सर्वसमावेशक होता. मात्र, तुषार गांधी यांचे विचार हे सर्व-समावेशक असल्याचे दिसत नाही. भारतात असलेल्या संसदीय लोकशाहीने इथल्या शोषित, वंचित समूहाला त्यांचे राजकारण करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. तो अधिकारास तुषार गांधी असे विधान करून नाकारत आहेत आणि प्रस्थापित पक्षाना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. खरंतर तुषार गांधी भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे सांगत आहेत.  मात्र, त्या महाविकास आघाडीतील पक्ष आणि त्यातील नेते हे कधी भाजपसोबत जातील याची कुठली शाश्वती नाही.

वंचित, बहुजनांचा राजकीय हक्क नाकारने हे अतिशय दुर्दैवी बाब

काल-परवापर्यंत भाजप विरुद्ध बोलणारे पक्ष प्रवक्ते आणि नेते हे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जाताना दिसत आहेत. त्यावर मात्र तुषार गांधी काहीही बोलताना दिसत नाही. तुम्ही जनतेला आश्वास्त करा की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केली होती. परंतु या मागणीला एकाही पक्षाने दाद दिली नाही. ज्या पद्धतीने यांचे भाजपसोबत मिळून-मिसळून राजकारण सुरू आहे, हे पाहता ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. असे असताना तुषार गांधी इथल्या शोषित, वंचित, बहुजनांचा राजकीय हक्क नाकारने हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. मला असं वाटतं त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. तसेच आपण येथील स्थानिक वंचितांवर अन्याय तर करत नाहीये ना? हा विचारही त्यांनी केला पाहिजे आणि त्यानंतर आपली भूमिका ठरवली पाहिजे, असे आमचे ठराविक मत असल्याची प्रतिक्रिया वंचितचे प्रमुख प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts