ipl 2024 dc vs lsg delhi capitals beat lucknow super giants by wickets

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ :  आयपीएल 2024 (IPL 2024) च्या 17 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं  (Delhi Capitals) यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरा विजय मिळवला आहे. होम ग्राऊंडवर पहिल्यांदा फलंदाजी करुन मॅच जिंकणाऱ्या लखनौ सुपर जाएंटसला दिल्लीनं सहा विकेटनं पराभूत केलं आहे.आजच्या मॅचपूर्वी लखनौची टीम तिसऱ्या स्थानावर होती. कॅप्टन रिषभ पंत (Rishabh Pant) आणि नवख्या जेक फ्रेजर मैक्गर्क, पृथ्वी शॉच्या खेळीमुळं दिल्लीला विजय मिळाला. दिल्लीचा हा यंदाच्या आयपीएलममधील दुसरा विजय ठरला. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॉलिंग करताना लखनौ सुपर जाएंटसला 7 विकेटवर 167 धावांवर रोखलं. लखनौचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करुन प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करु शकतो हे केएल. राहुलचं लॉजिक आज फेल गेलं. 

नवख्या जेक फ्रेजर मैक्गर्कला संधी देण्याचा निर्णय ठरला गेमचेंजर

रिषभ पंतनं आज दिल्लीच्या टीममध्ये जेक फ्रेजर मैक्गर्क संधी दिली होती.  जेक फ्रेजर मैक्गर्कनं 35 बॉलमध्ये पाच सिक्स आणि दोन चौकारांच्या जोरावर 55 धावा केल्या. त्यानं अगोदर पृथ्वी शॉ आणि त्यानंतर रिषभ पंतसोबत केलेली भागिदारी महत्त्वाची ठरली. पृथ्वी शॉनं देखील  32 धावा केल्या. 

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर आलेल्या रिषभ पंतनं देखील देखील जेक फ्रेजर मैक्गर्कला साथ दिली. त्यानं 2 सिक्स आणि चार चौकारांच्या जोरावर 24 बॉलमध्ये 41 धावा केल्या. यानंतर रिषभ पंत आणि जेक फ्रेजर मैक्गर्क मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला ट्रिस्टन स्टब्स आणि शाई होपनं दिल्लीला विजय मिळवून दिला. 

दिल्लीचा दुसरा विजय तर लखनौचा दुसरा पराभव

दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या पाच मॅचमध्ये चारवेळा पराभव स्वीकारला होता. चेन्नई सुपर किंग्जला दिल्लीनं पराभूत केलं होतं. दिल्ली कॅपिटल्सला चार पराभवांमुळं गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहायला लागलं होतं. आजच्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स लखनौला पराभूत करत दुसरा विजय मिळवला आहे. 

दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसनं यंदाच्या आयपीएलमध्ये आजच्या मॅचपूर्वी चार मॅचमध्ये एका पराभवासह तीन विजय मिळवले होते. त्यांना राजस्थान रॉयल्सनं पराभूत केलं होतं. आजच्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं लखनौचा यंदाच्या आयपीएलमधील दुसरा पराभूत केलं आहे. 

दरम्यान, लखनौनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सचे बॉलर खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी टिच्चून बॉलिंग केली होती. खलीलनं 2 तर कुलदीप यादवनं तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे लखनौच्या आयुष बदोनीनं अर्धशतक झळकवल्यानं लखनौचा संघ 7 बाद 167 धाव करु शकला होता. 

संबंधित बातम्या :

 Rishabh Pant DRS : रिषभ पंत पुन्हा एकदा चुकला, पंचांबरोबर वाद घालू लागला, डीआरएसवरुन मैदानावर राडा

 Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts