Raj Thackeray on Uddhav Thackeray says My criticism of BJP was not for the Chief Ministership for breaking 40 MLAs but for points bjp pm modi ram mandir mahayuti maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray :महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय व्यभिचार सुरू आहे त्याला राजमान्यता देऊ नका, असे आवाहन करतानाच महायुती बिनशर्त पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था असल्याने तसेच काही पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत भूमिका समजावून सांगितली.  

माझे  40 आमदार फोडले म्हणून नेहमी टीका केली नव्हती

राज ठाकरे यांनी सांगितलं की, मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना का पाठिंबा देत आहे याबाबत सविस्तरपणे बोललो आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या काही भूमिका पटल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही टीका केली होती. मात्र, टीका करत असताना तेव्हा आम्ही काय मागितलं नव्हतं ती मुद्द्यांवरती टीका होती. तसेच माझी टीका मला मुख्यमंत्रीपदा हवं आहे म्हणून टीका नव्हती, माझे 40 आमदार फोडले आहेत म्हणून नेहमी टीका केली नव्हती, तर मुद्द्यांवर होती, असे बोलतानाच राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली. 

मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते

ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये जे काही बदल झाले आहेत, त्या निर्णयाचे मी स्वागत सुद्धा केलं. यामध्ये राम मंदिर, कलम 370 रद्द करणे असे चांगले निर्णय त्यांनी घेतले. मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, मात्र आम्ही भूमिका बदलली नसून आम्ही मुद्द्यांवर बोलत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मोदी नसते तर हा मुद्दा प्रलंबितच राहिला असता त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी गरजेचं असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला. विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्दे असून ते मोदी पूर्ण करतील असे राज ठाकरे म्हणाले. तरुणांना रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय ते मार्गी लावतील अशी आशा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मोदी गुजरातचे असले, तरी त्यांचे गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. मात्र, सर्वच राज्यांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे लक्ष द्यावं असेही राज ठाकरे यांनी सांगितले. 

सभा घेण्यासंदर्भात पुढे निर्णय पुढे बघू

महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी ही बैठक झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधायचा याची यादी काही दिवसांमध्ये दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, सभा घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलं नाही. सभा घेण्यासंदर्भात पुढे निर्णय पुढे बघू असे ते म्हणाले.राज ठाकरे यांनी  ईडीच्या भीतीने भूमिका बदलल्याची टीका ठाकरे गटाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी ज्यांना कावीळ झाले त्यांना तसं सगळं दिसतं अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की मी पक्षाचा म्हणून विचार करत असतो त्यामुळे एक कार्यकर्ता काय विचार करतो हे बघत नाही. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts