congress leader vijay wadettiwar slams on minister dharamraobaba aatram claims to join bjp wadettiwar denies maharashtra politics maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vijay Wadettiwar On Dharamraobaba Aatram : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharamraobaba Aatram) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार, असा दावा केल्याने ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता स्वत: विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत धर्मरावबाबा आत्रामांवर जहरी टीका केली आहे. धर्मरावबाबा जर खरे राजा असतील आणि खरच त्याच्या दाव्यात दम असेल तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्याचे नाव सांगावं, भाजप प्रवेशासंदर्भात झालेल्या बैठकीचा पुरावा दाखवावा, त्यांनी तसे पुरावे दिल्यास आणि आपला दावा सिद्ध केल्यास मी त्यांची गुलामगिरी करेल, असे खुले आव्हान देत वडेट्टीवार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

गुटखा तपासत आणि खर्रा घोटत बसा

खोट बोलण्याची एक मर्यादा असते. धर्मरावबाबा आत्रामांचा गड मी खिळखिळा केला म्हणून मला बदनाम करण्याचे षडयंत्र ते रचत आहेत. मात्र, त्यांना त्यात कधीही यश येणार नाही. पक्ष फोडल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं. ते ही अन्न औषध प्रशासनमंत्री त्यामुळे त्यांनी गुटखा तपासत आणि खर्रा घोटत बसा, इतकंच काम उरलं असल्याचा खोचक टोलाही विजय वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबा आत्रामांना लगावला आहे. माझं काम पक्षासाठी समर्पित आहे, त्यामुळे मी कुठेही जाणार नाही.

धर्मरावबाबांना आता कोणी विचारत नाही. लोकसभा शिवाय त्यांना इतर तिकीट मिळेल म्हणून अनेक महिने त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना काहीही मिळाले नाही. ते खरे राजे असतील तर त्यांनी आपला दावा सिद्ध करावा, ते त्यात यशस्वी झाल्यासा मी राजकारण सोडेल अन्यथा त्यांनी राजकारण सोडावे, असे खुले आव्हानही वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबा आत्रामांना दिले आहे.

सत्तेसाठी कुठेही जायला मी त्यांच्या सारखा लाचार नाही 

विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक होत्या. त्यासाठी वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ही इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र विजय वडेट्टीवार यांची ही इच्छा काँग्रेस मधील उच्चपदस्थ नेत्यांनी धुडकावून लावत, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली. परिणामी, विजय वडेट्टीवार हे नाराज असल्याचा दावा धर्मरावबाबा आत्रामांनी केला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही ते म्हणाले होते. यावर बोलताना स्वत: विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत धर्मरावबाबा आत्रामांचे सर्व दावे फेटाळून लावले आहे.

माझ्या मुलीला तिकीट दिले नाही हा पक्षाचा निर्णय आहे. पण मी सत्तेसाठी लढणारा नाही तर, पक्षाच्या विचारधारेसाठी लढणारा सच्चा कार्यकर्ता आहे. मला आजवर पक्षाने भरपूर दिले असून मी मंत्रीपद, दोन वेळा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. आता लोकसभा निवडणुकीत आत्राम यांचा गड शिल्लक राहणार नाही या भीतीने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी आत्राम यांच्या सारखा लाचार नाही कि जो सत्तेसाठी कुठेही जाईन. उलट लोकसभेच्या निकालानंतर यांनाच काँग्रेसकडे याचना करावी लागेल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts