Rahul Gandhi slams PM Modi in Rahul Gandhi Bhandara rally

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भंडारा: सध्याच्या काळात प्रसारमाध्यमांकडून केवळ  बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्स आणि पंतप्रधान मोदी यांनाच 24 तास दाखवले जाते. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर कोणीही बोलत नाही. नरेंद्र मोदी (PM Modi) घटकेत समुद्राखाली असतात तर घटकेत हवेत विमानातून उडत असतात, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. ते शनिवारी साकोलीत काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या धार्मिक राजकारणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.  मोदी कधी समुद्राखाली पूजा करताना दिसतात, त्यावेळी त्यांच्यासोबत पुजारी नसतो. मोदी लष्करी अधिकाऱ्यांसोबत पूजेला बसलेले दिसतात. मग ते सीप्लेनने थेट हवेत जातात. मोदींनी एकप्रकारे ही सगळी थट्टा चालवली आहे. ते विकासाच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून 24 तास धर्माचे राजकारण सुरु असते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण करतो; पीएम मोदी धर्मावर 24 तास बोलतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

देशातील लोक कोरोनाने मरत होते आणि मोदी थाळ्या वाजवायला सांगत होते: राहुल गांधी

कोरोनाच्या काळात देशात मृतदेहांचा खच पडला होता. गंगेत लाखो मृतदेह वाहत होते. पण पंतप्रधान मोदी लोकांना सांगत होते की, थाळ्या वाजवा. नंतर ते म्हणाले मोबाईल फोनच्या टॉर्च लावा. जग या सगळ्याकडे बघत होते. कारण इतर कोणत्याही देशातील पंतप्रधान थाळ्या वाजवत नव्हता, ते लोकांचा जीव वाचवत होते, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले. नरेंद्र मोदी घटकेत एक गोष्ट बोलतात, घटकेत दुसरी गोष्ट बोलतात. ते लोकांची दिशाभूल करुन उद्योगपतींच्या खिशात पैसे टाकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

राहुल गांधींच्या सभेत नियोजनाचा अभाव

राहुल गांधी यांच्या भंडाऱ्यातील सभेत नियोजनाचा पार बोऱ्या वाजताना दिसला. या सभेसाठी 50 हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज होता. मात्र, सभेच्या ठिकाणी प्रत्यक्षात लाखाच्या आसपास लोक आले. मात्र, त्याठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे अनेक लोकांना बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले. 

आणखी वाचा

‘आमचं सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts