ipl 2024 pbks vs rr toss update sanju samson won the toss and decided to rajasthan royals bowl first against punjab kings

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चंदीगड: आयपीएलमध्ये (IPL 2024) गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) आज आमने सामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्सनं  यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवला होता. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानला पराभव गुजरात टायटन्सला पराभव स्वीकारावा लागला होता.  यंदाच्या आयपीएलमधील पहिला पराभव विसरुन नव्यानं मैदानात उतरण्याचा प्रयत्न राजस्थान रॉयल्स प्रयत्न करेल.  राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संजू सॅमसननं दिली. गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या बॉल विरुद्ध पराभव झाल्यानंतर आजच्या मॅचमध्ये खबरादारी  म्हणून संजूनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या संघात जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विन नसतील अशी माहिती देखील सॅमसननं दिली. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन आज खेळणार नसून नेतृत्त्वाची जबाबदारी सॅम करन कडे असेल. 

राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पहिला पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौ सुपर जाएंटस, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर राजस्थाननं गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं होतं. मात्र त्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध अखेरच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला होता. 

दुसरीकडे पंजाब किंग्जला पाचपैकी दोन मॅचमध्ये विजय मिळालेला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सला पंजाब किंग्जनं पराभूत केलं आहे. तर, त्यांना रॉयल चॅलेंजर्स बगंळुरु, लखनौ सुपर जाएंटस, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 

राजस्थान रॉयल्स आजच्या मॅचमध्ये गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवण्याच्या इराद्यानं उतरेल. तर, दुसरीकडे पंजाब किंग्जला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय आवश्यक असेल. 

 राजस्थानला पराभूत करायचं असल्यास पंजाब किंग्जच्या टॉप ऑर्डरची भूमिका महत्त्वाची असेल. पंजाबसाठी शिखर धवन, जितेश शर्मा, प्रभसिमरनच्या फलंदाजीच्या फॉर्मची चिंता आहे. दुसरीकडे आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांच्या जोडीवर पंजाबची मदार असेल.तर, राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्ट विरोधात पंजाबचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल. 

राजस्थानकडून रियान पराग, संजू सॅमसन, जोस बटलर हे चांगली फलंदाजी करत आहेत. दुसरीकडे यशस्वी जयस्वाल यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ 63 धावा केल्या आहेत. पंजाबच्या अर्शदीप सिंगच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष असेल..

राजस्थानची टीम 

संजू सॅमसन (कॅप्टन विकेटकीपर), रियान पराग, शिमरन हेडमायर, ध्रुवर जुरेल, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, ट्रेंट बोल्ट, केशव महाराज, आवेश खान, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल

पंजाबची टीम

जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, सॅम करन (कॅप्टन), लियम लिविंग्सटन, जितेश शर्मा (विकेट कीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा 

संबंधित बातम्या :

IPL 2024, MI vs CSK :ऋतुराज हार्दिक आमने सामने, मुंबई आणि चेन्नईच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी? 

Yuzvendra Chahal : युजवेंद्र अनोखं द्विशतक झळकवणार, केवळ तीन पावलं दूर, आयपीएलमध्ये जे कुणाला जमलं नाही ते करणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts