Devendra Fadnavis Criticized congress leader vijay wadettiwar at Gadchiroli mahayuti sabha maharashtra politics maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis On Congress: काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना आपला पराभव दिसत असल्यामुळे काँग्रेसमधील नेते महायुतीचे उमेदवार अशोक नेते हे आदिवासी नसल्याचा अप्रचार करत आहेत. कदाचित ते हे विसरले असतील की अशोक नेते हे गेली 25 वर्ष एक आदिवासी नेता म्हणून या मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेस आज धर्मरावबाबा आत्राम (Dharamraobaba Aatram) यांच्यावर टीका करत आहे. कारण त्यांना एक सर्वसामान्य आदिवासीचा मुलगा मोठा होतानांचे बघवत नाहीय. कारण काँग्रेसला आदिवासींना आपल्या हाताखालचे चपराशी करण्याची मानसिकता या काँग्रेसची असल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर केली आहे. गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील भिसी येथील माहयुतीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी हे भाष्य करत काँग्रेसवर तोफ डागली आहे. 

काँग्रेससाठी आदिवासी म्हणजे आपल्या हाताखालचे चपराशीच

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना बुद्धिहीन संबोधल्याचे प्रकरण आता तापू लागले आहे. असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना आज भाजपने आज चांगलेच घेरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील भिसी येथील जाहीर सभेत मंत्री आत्राम यांनी काँग्रेस आणि वडेट्टीवारांना वैनगंगेत बुडवा असे आवाहन आदिवासींना केलेय. काँग्रेस आदिवासींची टिंगल उडवत असून त्यांना दुर्गम आदिवासी क्षेत्रात काम करणारा माणूस खपत नसल्याचे सांगत काँग्रेसला धडा शिकवण्याचे आवाहन आत्राम यांनी केले. आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गेली अनेक वर्षे उत्तम नेतृत्व करणाऱ्या अशोक नेते आणि धर्मराव आत्राम सारख्या आदिवासी नेत्या विरोधात अशी भाषा काँग्रेसची मानसिकता दर्शवत असून त्यांना आदिवासी माणूस मोठा होताना रुचत नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसला आदिवासी हे आपल्या हाताखालचे चपराशीच हवे आहेत. काँग्रेसला आपला पराभव दिसत असल्याने सर्व नेते आता हतबल झाले असून खासदार अशोक नेते बोगस आदिवासी असल्याच्या आरोप ते करत आहे. मात्र काँग्रेसने आदिवासी समाजातील तळागाळातील जनतेला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते तेवढ्याच ताकतीने उफाळून येणार आहेत. त्यामुळे आज यानिमित्ताने मी आदिवासी जनतेला असे आवाहन करतो की यांना आगामी निवडणुकीमध्ये चांगला धडा शिकवला पाहिजे. असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले आहे.

दहा वर्षात न भूतो न भविष्य असा बदल 

नेहरूजींपासून सोनिया गांधी पर्यंत आणि अलीकडे राहुल गांधींपर्यंत  साऱ्यांनी गरिबी हटाव चे नारे दिले. मात्र या देशातील गरीब हटला पण गरिबी होती तशीच आहे. त्यातच एक चहा विकणारा तरुण या देशाचं नेतृत्व करतो आणि देशात केवळ दहा वर्षात न भूतो न भविष्य असा बदल घडवून आणतो. मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीरेषेच्या बाहेर काढत मोठे परिवर्तन केलं. 20 कोटी लोकांना पक्की घर दिलीत. 11 कोटी लोकांनी शौचालय आणि 50 कोटी लोकांना घरात पिण्याचे शुद्ध पाणी या सरकारने दिले. असे अनेक विकासकामे आपल्याला सांगता येतील.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चंद्रपूर येथे आले असता त्यांनी असे सांगितले की, दहा वर्षात झालेली विकास कामे ही केवळ झाकी असून खरा पिक्चर अजून बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधानांच्या नेतृत्वातील विकसित भारत आपल्या बघायचा आहे. त्यामुळे देशाच्या या विकासकामात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी पुन्हा त्यांच्या मागे सक्षमपणे आणि पूर्ण ताकतीने उभे राहण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts