ipl 2024 sanju samson played major role in run out of liam livingstone

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चंदीगड : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील (IPL 2024) 27 वी मॅच रोमहर्षक झाली. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यातील लढत अखेरच्या ओव्हरपर्यंत गेली. अखेर राजस्थाननं तीन विकेटनं विजय मिळवला. राजस्थान आणि पंजाबच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. राजस्थानच्या हेटमायरनं पंजाबच्या हातून विजय खेचून आणला. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर 147 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा राजस्थाननं यशस्वीपणे पाठलाग केला. 10 बॉलमध्ये 27 धावा करणाऱ्या हेटमायरला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यत आलं. संजू सॅमसननं (Sanju Samson Run Out) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. संजूचा हा निर्णय राजस्थानच्या फलंदाजांनी यशस्वी ठरवला. पंजाबच्या डावाला राजस्थानच्या बॉलर्सनी नियमितपणे धक्के दिले. या दरम्यान संजू सॅमसननं महेंद्र सिंग धोनी स्टाइलमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केलं. 

संजू सॅमसनकडून धोनी स्टाइलनं रन आऊट

राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन  यानं त्याच्या दर्जेदार विकेटकीपिंग कौशल्याची झलक दाखवून दिली. संजू सॅमसननं ज्या प्रकारे लिव्हिंगस्टोनला बाद केलं ते सर्वजण पाहत राहिले. 

आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स वर संजू सॅमसननं केलेल्या रनआऊटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाब किंग्जच्या डावाच्या 18 व्या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहल बॉलिंग रत होता. या ओव्हरचा पाचवा बॉल चहलनं टाकला तेव्हा आशुतोष शर्मा स्ट्राइकवर होता. आशुतोष शर्मानं गॅपमध्ये फटका मारला. पंजाबचे दोन्ही फलंदाज दोन धावा घेतील, असं वाटत असतानाच राजस्थानच्या टीममध्ये पदार्पण करणाऱ्या तुनष कोटियननं बॉल अडवून लगेचच संजू सॅमसनच्या दिशेनं फेकला. यावेळी संजनं खास महेंद्रसिंग धोनी स्टाइलनं बॉल स्टम्पच्यादिशेनं वळवला. बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि यामध्ये लिव्हिंगस्टोन रनआऊट झाला. संजू सॅमसनचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.    

पाहा व्हिडीओ :

आशुतोष शर्मा आणि लिव्हिंगस्टोन दोन धावा घेतील, अशी शक्यता असताना एकच धाव काढली गेली. लिव्हिंगस्टोनचा समज दोन धावा काढता येऊ शकतात असा झाला. तो निम्या खेळपट्टीपर्यंत धावत आला. यानंतर आशुतोषच्या कॉलमुळं तो माघारी फिरला.लिव्हिंगस्टोननं क्रीजमध्ये माघारी जाईपर्यंत तुषार कोटियननं बॉल अडवून संजू सॅमसनच्या दिशेनं टाकला होता. यावेळी संजू सॅमसननं थेट धोनी स्टाइलमध्ये बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉल स्टम्पवर आदळला. यामध्ये लिव्हिंगस्टोन 21 धावांवर बाद झाला. 

दरम्यान, राजस्थान रॉयल्स सहा पैकी पाच मॅचमध्ये विजय मिळवून गुण तालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. 

संबंधित बातम्या :

 IPL 2024, PBKS vs RR : पंजाबनं नाकीनऊ आणलं, अटीतटीच्या लढतीत राजस्थान विजयी, हेटमायर ठरला जाएंट किलर

Rohit Sharma : आज तुझा भाऊ बस चालवणार, रोहित शर्माचा अनोखा अंदाज, चेन्नईला सूचक इशारा

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts