PBKS vs RR: Rajasthan batsman Shimron Hetmyer leads Rajasthan Royals to victory against Punjab Kings.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Punjab Kings vs Rajasthan Royals: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2024 च्या हंगामातील 27 वा सामना खेळला गेला. या सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत पोहचला होता. मात्र पुन्हा एकदा पंजाब किंग्सला रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानचा फलंदाज शिमरॉन हेटमायरने पंजाबकडून विजय हिसकावून घेतला.

शिमरॉन हेटमायरच्या 10 चेंडूत 27 धावांच्या नाबाद खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात एक चेंडू शिल्लक असताना पंजाब किंग्सचा तीन गडी राखून पराभव केला. राजस्थानला शेवटच्या 14 चेंडूत 30 धावांची गरज होती, त्यानंतर हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल (पाच चेंडूत 11 धावा) यांच्या शानदार फलंदाजीने राजस्थानला पाचवा विजय मिळवून दिला.

6 चेंडूंनी पंजाबचा विजय केला निश्चित-

19व्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर सॅम कुरनने दोन विकेट्स घेत फक्त दोन धावा दिल्या. यानंतर राजस्थानला शेवटच्या षटकांत 10 धावा करायच्या असताना अर्शदीप सिंगने पहिल्या दोन चेंडूत एकही धाव दिली नाही. आता राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत 10 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्ट शिमरॉन हेटमायरसह क्रीजवर होता. अशा स्थितीत तिसऱ्या चेंडूवर एक धावा आली असती किंवा तोही डॉट झाला असता, तर पंजाबने जवळपास सामना जिंकला असता, पण हेटमायरने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने गेला. केवळ हेटमायरची विकेट पंजाबला विजय मिळवून देऊ शकली असता. मात्र पुढच्या चेंडूवर दोन धावा आणि त्यानंतर हेटमायरने षटकार ठोकून आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

गुणतालिकेत राजस्थानचे वर्चस्व कायम-

पंजाब किंग्जला आठ गड्यांच्या मोबदल्यात 147 धावांवर रोखल्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.5 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत गुणतालिकेत आपले वर्चस्व कायम राखले. हेटमायरच्या 10 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी व्यतिरिक्त, रोव्हमन पॉवेलने महत्त्वपूर्ण टप्प्यांवर सलग दोन चौकार मारले हे देखील राजस्थानच्या विजयाचे कारण ठरले. पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडाने चार षटकांत 18 धावांत दोन बळी घेतले, तर दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या सॅम कुरनने 25 धावांत दोन बळी घेतले. या विजयासह राजस्थानचा संघा गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts