Asia Cup 2023 Format Is Decided India, Pakistan And Nepal In Same Group ; भारताबरोबर पाकिस्तानसह कोणता देश एकाच गटात खेळणार पाहा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया चषक आता कोणत्या देशांमध्ये आणि कधीपासून सुरु होणार आहे, याती माहिती समोर आली होती. पण या स्पर्धेत भारताच्या गटामध्ये पाकिस्तानसह कोणता देश आहे हे आता समोर आले आहे. त्यामुळे भारतीय संघ बाद फेरीत पोहोचणार की नाही, हे या गोष्टीवरून ठरणार आहे.आशिया चषकात एकूण सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अफगाणिस्तान आणि नेपाळ असे सहा देश खेळणार आहेत. या सहा देशांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आशिया चषकातील एका गटात प्रत्येकी तीन संघ असणार आहेत.

आशिया चषकातील ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ, तर ‘ब’ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका संघ असणार आहेत. गटातील दोन संघ सुपर-४मध्ये दाखल होतील. त्यानंतर सुपर-४मधील अव्वल दोन संघांमध्ये फायनल होईल. या ‘फॉरमॅट’नुसार भारत-पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने येतील आणि दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरले, तर एकूण तीन वेळा भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आता आशिया चषकाची रंगत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

आशिया चषक स्पर्धा ही भारतासाछी महत्वाची असेल. कारण गेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आशिया चषकानंतर वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे आशिया चषक जो संघ जिंकेल त्यांचे मनोबल विश्वचषकात उंचावलेले असेल.

स्पर्धा कधी : ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर

सामने किती : १३ वन-डे लढती

सामने कुठे : पाकिस्तानमधील चार सामने लाहोरमध्ये, तर श्रीलंकेतील नऊ सामने कँडी, पल्लीकलमध्ये होणार आहेत.

सहभागी देश : ६ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ)

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

विजेते : भारताने ही स्पर्धा सात वेळा, तर श्रीलंकेने सहा वेळा जिंकली आहे. पाक दोन वेळा विजेता आहे.)

[ad_2]

Related posts