Narayan Rane allegation on Uddhav Thackeray Narayan Rane Says I and MLA who are with Shinde witnessed who was taking extortion Sindhudurg Lok Sabha Election 2024 marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सिंधुदुर्ग : खंडणी कोण आणि कुठे घेत होतं, याचा साक्षीदार मी आणि शिंदेसोबत गेलेले आमदार आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला आहे. असली बाळासाहेब, हिंदुत्व, अभिमान, त्याग करणारे बाळासाहेब होते. नकली, विकला जाणारा उद्धव ठाकरे, वडिलांच्या नावावर कर्तृत्व मिळवल्याची टीकाही नारायण राणेंनी केली आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं’

उद्धव ठाकरे याचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून देशाच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीका करत आहे. कोण खंडणी घेत होता, कुठल्या रूममध्ये घेत होता याचा साक्षीदार मी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं, बाकी यांचा काही उद्योगधंदा नाही. जे 40 आमदार सोडून गेले ते पोच करत होते.

‘एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही’

उद्धव ठाकरे यांनी एक फोन करायचे तीन लाख रुपये घेतले, एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर भेकड अशी टीका केली. नारायण राणेंनी यावर उत्तर शब्दात देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल तशी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेबांनी विरोध केला, तिथे गुडघे टेकायला जातात

उद्धव ठाकरे यांना कुठलीही नोटीस आली की, मोदींच्या दारी सरेंडर व्हायचे. सुशांत सिंह आणि दिशा सालियान केसमध्ये किती तरी वेळा भेटले ते विसरले. यांच्या डोक्यावर परिमाण झाला नाहीतर असं बोलणार नाही. काहीही बोलतो, ते भोगावं लागेल, असंही राणेंनी म्हटलं आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, तिथे उद्धव ठाकरे गुडघे टेकायला जातात. उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार आणि मोदींवर टीका करतात, अशी टीकाही राणेंनी केली आहे. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts