MI vs CSK IPL 2024 Head-to-head record for Mumbai Indians vs Chennai Super Kings overall stats, most runs, wickets

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs CSK, IPL 2024 : मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई आणि मुंबई पूर्णपणे तयार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबईची अतिशय खराब जाली. परंतु, मागच्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करत टीम विजयाच्या मार्गावर परतली आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेमधील दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. सीएसकेने या स्पर्धेत तीन सामने जिंकले आणि दोन सामने हरले आहेत. त्यामुळे सीएसकेलाही विजयाची आशा आहे.

एमआयने आपल्या मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध 197 धावांचे लक्ष्य पूर्ण करत 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. त्यात ईशान किशनने 69 (34) स्फोटक खेळी केली. ईशान किशन यानं पहिल्याच चेंडूपासून आपल्या दणदणीत फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्यामुळे टीमला अत्यंत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करता आला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 52 (19) देखील अप्रतिम कामगिरी केली आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सला आरसीबीने समोर ठेवलेले लक्ष्य फक्त 15.3 ओव्हर्समध्येच पूर्ण करणे शक्य झाले. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट्स मिळवल्या. श्रेयस गोपाळनेदेखील बुमराची चांगली साथ दिली. हे सर्वच खेळाडू आपला चांगला फॉर्म कायम ठेवतील अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आशा आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या मागच्या सामन्याचा विचार केल्यास या टीमने एमए चिदंबरम स्टेडियमवर 7 विकेट्सनी मोठा विजय प्राप्त केला होता. कर्णधार ऋतुराज गायकवाड 67* (58) चा फॉर्म परत आला. त्याने अप्रतिम खेळ करत सुपर किंग्सला अत्यंत कठीण पिचवर सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य झाले.रवींद्र जडेजा नेदेखील सुपरडुपर गोलंदाजी करत केकेआरला 137 धावांवर थांबवायला मदत केली. ही धावसंख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनीदेखील जडेजाला चांगलीच मदत केली.

हेड टू हेड आकडे काय सांगतात ? MI vs CSK HEAD-TO-HEAD IN IPL

चेन्नई आणि मुंबई आयपीएलमध्ये आतापर्यंत 38 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने तब्बल 21 वेळा विजय मिळवलाय, तर चेन्नईला फक्त 17 सामन्यात विजयाची चव चाखता आली. वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघामध्ये 11 सामने झाले आहेत, त्यामध्ये मुंबईने सात सामने जिंकलेत, तर चेन्नईने चर सामने जिंकले आहेत. 

सर्वाधिक धावा – MOST RUNS IN MI vs CSK IPL MATCHES

 







फलंदाज डाव धावा सरासरी स्ट्राईक रेट सर्वोच्च धावसंख्या
सुरेश रैना (CSK) 32 736 28.30 140.19 83*
रोहित शर्मा (MI) 28 732 28.15 128.42 87
एमएस धोनी (CSK) 32 712 37.47 135.61 63*

सर्वाधिक विकेट – MOST WICKETS IN MI vs CSK IPL MATCHES







गोलंदाज डाव विकेट. इकॉनॉमी. सरासरी. सर्वोच्च स्पेल
लसीथ मलिंगा (MI) 23 37 7.27 17.59 5/32
डेवोन ब्राव्हो (CSK, MI) 27 37 8.20 20.51 4/42
हरभजन सिंह (MI, CSK) 28 26 6.57 25.50 5/18

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts