Shivaji Underground in Bhimnagar Mohalla play permission dined from Pune University Kiran Mane facebook post Entertainment latest update detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kiran Mane Facbook Post : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) या नाटकाचे आतापर्यंत साडेआठशे प्रयोग झाले आहेत. परखडपणे काही गोष्टी मांडणारं हे नाटक रसिकप्रेक्षकांच्या देखील तितकचं पसंतीस पडतं. पण नुकतच या नाटकाच्या एका प्रयोगाला विद्यापीठाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांन कमेंट्स करत त्यांच्या या भूमिकेचं समर्थन देखील केलं असल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कारण 12 एप्रिल रोजी या नाटकाचा पुण्याच्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रयोग होणार होता. पण या विद्यापीठानं या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी नाकारल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांकडून विद्यापीठाच्या या भूमिकेचा देखील विरोध  करण्यात आला. 

किरण माने यांनी काय म्हटलं?

किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की, ‘वर्चस्ववादी भेकड आहेत. समाजाला समतेच्या, बंधुत्वाच्या नात्यात बांधणार्‍या कलाकृतींची या लोकांना भिती वाटते. म्हणून तर काल पुणे विद्यापीठानं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला अचानक नकार दिला. अर्थात मला फार आश्चर्य नाही वाटलं. कारण मला माहितीये, हल्ली हुकूमशहांच्या भेदरट पिलावळीचा थयथयाट सुरू आहे. द्वेष पसरवणार्‍या, खोटा भडक इतिहास सांगणार्‍या कलाकृतींना राजाश्रय दिला जातो. यात बहुजन महामानवांचा खरा इतिहास सांगून मानवता आणि प्रेमाचा संदेश देणारी नाटकं आली, सिनेमे आले… ते लोकप्रिय झाले… तर लोक एकमेकांचा तिरस्कार कसे करणार? मग लोकांना एकमेकांत झुंजवून, फूट पाडून सत्ता अबाधित ठेवायचं कारस्थान कसं यशस्वी होणार? या भितीनं हे पछाडले आहेत.’

शिवरायांचा खरा इतिहास दाखवणारं हे नाटक – किरण माने

पुढे त्यांनी म्हटलं की, फुले-आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त ‘विद्यार्थी विकास मंच’ने या नाटकाचा प्रयोग काल १२ एप्रिल रोजी विद्यापीठात आयोजित केला होता. रयतेचं स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी झगडलेल्या छ. शिवरायांचा खरा इतिहास दाखवणारं हे नाटक आहे. अचानक एक दिवस आधी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ने प्रयोगाला परवानगी नाकारली. आता यासाठी कुणाचा दबाव असेल? कारण काय? हे शोधायला आपण आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरूया.

नाटकातून संदेश काय दिला आहे?

त्यासाठी हे पाहुया की नाटकातून संदेश काय दिला आहे? तर, “छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव वापरून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नका. शिवरायांनी अठरा पगड जातीचे लोक सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. अनेक विश्वासू मुस्लीम सहकारी त्यांच्या सैन्यात होते.” हा आशय सांगणारं हे नाटक आहे, ज्याचे आजवर साडेआठशे प्रयोग झालेत ! सरळ आहे, हा नकार नाटकाला नाही, तर त्यातून मांडल्या जाणार्‍या आशयाला आहे. सेन्साॅरसंमत असलेल्या नाटकाला नकार दिल्यामुळे पुन्हा हे सिद्ध झालंय की ही दडपशाही संविधानाला पायदळी तुडवत आहे. आता तरी आपल्याला जागं व्हायला हवं. झुंडशाहीला जागा दाखवण्याची वेळ जवळ आलीय. आता त्यांनी कितीही थांबवूद्यात… आपण व्यक्त व्हायचं, असंही किरण माने यांनी पुढे म्हटलं आहे. 

किरण माने यांनी या पोस्टचा शेवट एका कवितेने केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की, बहरे भी सुनलें, इतनी जोर से बोलेंगे,अंधे भी पढ़ लें इतना साफ लिखेंगे, अगर तुम जमीं पे जुल्म लिख दो,आसमान पे इंकलाब लिखा जाएगा…सब याद रखा जाएगा,सबकुछ याद रखा जाएगा ! अशी कविता किरण माने यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी लिहिली आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत अगदी बरोबर, वास्तव विचार मांडलात, असं म्हटलं आहे. 

ही बातमी वाचा : 

Salman Khan : मुख्यमंत्र्यांनी केली फोनवरुन चर्चा, उपमुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल; सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राजकीय वातावरणही तापलं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts