Mumbai Maharashtra Five Lakhs Rupees Help To The Family Of The Deceased Student In The Government Hostel By Minister Chandrakant Patil Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrakant patil on Mumbai Hostel Girl Case:  मुंबईतील (Mumbai) शासकीय वसतिगृहामध्ये (Hostel) घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या  वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. ही माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांची दादार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन भेट घेतील. तसेच यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत योग्य न्याय मिळवून देण्याचे देखील आश्वासन दिले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवलानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.’ तसेच विद्यार्थीनींच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केल्याचं यावेळी चंद्रकांत पाटीलांनी सांगितलं. ‘कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल’ असही आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं. 

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील शासकीय वसतिगृतील विद्यार्थीनीवर वसितीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:देखील रेल्वेखाली जाऊन आपला जीव दिला. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांना वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावर या तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यास निदर्शनास आलं होतं. तेव्हा पोलिसांनी त्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु काहीच वेळात त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या सुरक्षा रक्षकाने जवळील चर्नी रोड स्थानकावर जाऊन ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास देखील सुरुवात केली. 

त्यामुळे मुंबईतील वसतिगृहामध्ये मुली सुरक्षित नाही का असा सवाल उपस्थित करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना तपासाची सविस्तर माहिती देखील दिली. तसेच ‘उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात येईल आणि महिलांना योग्य सुरक्षा देण्यात येईल’ असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. यावेळी चंद्रकांत पाटलांसोबत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर हे देखील उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Conversion Case: वसईतील कथित धर्मांतर प्रकरणात अटक झालेला आरोपी हिंदू, पोलिसांच्या तपासातून उघड

[ad_2]

Related posts