Weather Update Today IMD Rain Forecast Unseasonal Rain in Maharashtra Vidarbh Marathwada Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे. राज्यात काही भागात पुढील काही पावसाची शक्यता आहे. विदर्भ (Vidarbh), मराठवाड्यात (Marathawada) सलग पाच दिवस अवकाळी पावसानं (Rain Forecast) धुमशान घातलं आहे. आजही पावसाची शक्यता कायम आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

पुढील 24 तासात या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्या पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. पुढील 24 तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागाता पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे.

पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज 

आयएमडीने जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे 16 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या विविध भागात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडू शकतो.

या भागात उष्णतेची लाट

15 एप्रिल ते 18 एप्रिल या काळात तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल भागात दमट हवामानासह उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. 16 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.  

किनारी भागात तापमान वाढणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील लोकांना पुढील पाच दिवस उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. आयएमडीनेही दमट उन्हाळ्याचा अंदाज वर्तवला आहे. ओडिशातील तापमान पुढील काही दिवसांत चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ओडिशातील अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts