kkr vs lsg video ramandeep singh takes superb catch of deepak hooda ipl 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

KKR vs LSG, IPL 2024 : श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाइट रायडर्सनं ईडन गार्डनवर लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेटनं दारुण पराभव केला. कोलकात्यानं लखनौला 161 धावांवर रोखलं. यामध्ये फिल्डर्सची कामगिरी शानदार झाली. कोलकात्याकडून आज एकही झेल सोडण्यात आला नाही. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर रमनदीप यानं हवेत झेपवत शानदार झेल घेतला.  नेटकऱ्यांच्या मते, रमनदीपनं घेतलेला झेल यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल आहे. मिचेल स्टार्कला दीपक हुड्डाने शानदार फटका मारला, हा चौकार जाणार असेच सर्वांना वाटत होते. पण रमनदीप यानं हवेत झेपवत शानदार झेल घेतला. या झेलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

ईडन गार्डन मौदानावर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कने त्याच्या पहिल्या दोन षटकांत 18 धावा खर्च केल्या होत्या. पण श्रेयसने त्याच्यावर विश्वास दाखवत पॉवरप्लेमधील तिसरे षटक त्याला देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कोलकात्याला पहिलं यश मिळालं.

पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने चौथा चेंडू चौथ्या स्टम्पवर टाकला.  दीपक हुड्डा याने ही लेन्थ चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला. हा चौकार जाणार असेच वाटत होते, पण रमणदीप सिंगने पूर्ण ताकदीनिशी हवेत झेपवत नेत्रदीपक झेल घेतला. खराब फॉर्ममधून जात असलेल्या दीपक हुडाने 10 चेंडूत आठ धावा केल्या. रमनदीप सिंह यानं शानदार झेल घेतल्यानंतर सगळ्या संघाने त्याचं अभिनंदन केले. केकेआरच्या कॅम्पमध्येही एकच जल्लोष होता. केकेआरचा मालक शाहरुख खान यानेही रमनदीपच्या झेलचं कौतुक केले. रमनदीप सिंहचा हा झेल यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल असल्याचं नेटकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर झेल वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ 

 

कोलकात्याचा लखनौवर सहज विजय – 

ईडन गार्डन मैदानावर कोलकात्यानं लखनौला फक्त 161 धावांवर रोखलं. त्यानंतर हे आव्हान आठ विकेट राखून सहज पार केले. कोलकात्याकडून फिलीप साल्ट यानं शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय मिचेल स्टार्क यानं तीन विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्यानं लखनौला पहिल्यांदाच पराभूत केले. कोलकात्यानं या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोलकात्याचा हा चौथा विजय ठरला. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts