CSK vs MI IPL 2024: Rohit Sharma faced an embarrassing moment while fielding, wife ritika reaction viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs MI Rohit Sharma: रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) शतक झळकावले. मात्र त्याचे शतक चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. रोहितने 63 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 105 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईला विजय मिळवता आला नसला तरी वानखेडेवर उपस्थित असणाऱ्या चाहते रोहितची फलंदाजी पाहून आनंदी झाले.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्षेत्ररक्षण करताना पॅन्ट उतरल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रुतुराज गायकवाडने लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावला. हवेत चेंडू पाहून रोहित शर्मा चेंडू पकडण्यासाठी धावला. मात्र खूप प्रयत्न करूनही तो झेल पकडू शकला नाही, मात्र यादरम्यान त्याची पॅन्ट खाली उतरली. रोहितची पॅन्ट उतरल्याचे समजताच मैदानात उपस्थित असणारी पत्नी रितिका देखील लाजत हसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. रितिकाची ही रिॲक्शन देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


रोहितच्या शतकानंतरही मुंबईने सामना गमावला

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 6 बाद 186 धावाच करता आल्या. सलामीला आलेल्या रोहित शर्माने शतक झळकावले आणि 63 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. मात्र रोहितची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. 

17व्या मोसमात मुंबईचा चौथा पराभव-

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 17व्या मोसमात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने दिल्ली आणि आरसीबीविरुद्ध विजय मिळवून दमदार पुनरागमन केले, मात्र सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.

सामन्यानंतर हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला?

निश्चितपणे लक्ष्य गाठता आले असते, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि मथिशा पथिराणाने चांगले चेंडू टाकले. तो त्याच्या प्लॅन्समध्ये खूप हुशार होता आणि त्याने लाँग बाऊंड्रीचा खूप चांगला वापर केला. तो गोलंदाजीसाठी येण्याआधी सामना आमच्या ताब्यात होता. स्टम्पच्या मागे एक माणूस उभा आहे, जो त्यांना योग्य डावपेच शिकवणार, हे त्यांना माहिती आहे, असं म्हणत हार्दिकने धोनीचे कौतुक केली. शिवम दुबेला फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे कठीण झाले असते, असं हार्दिक म्हणाला. आम्ही काहीतरी वेगळे करू शकलो असतो. आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे, असं हार्दिकने सांगितले.

संबंधित बातम्या:

सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न

टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान

7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo’s

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts