My name is ‘Mahin-dra’; Anand Mahindra’s post after seeing MS Dhoni’s explosive innings, discussion on social media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anand Mahindra Reaction viral on CSK MS Dhoni Batting: चेन्नईच्या फलंदाजीवेळी एमएस धोनीने चार चेंडूचा सामना करताना 20 धावांची खेळी केली. यामध्ये षटकारांची हॅट्ट्रीक केली होती. इतक्याच धावांच्या फरकानं चेन्नईने मुंबईचा पराभव केला. धोनीच्या या स्फोटक खेळी पाहून सर्व स्तरावरुन त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

प्रसिद्ध व्यवसायिक आनंद महिंद्रा यांनी देखील एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट शेअर करत धोनीचे कौतुक केलं आहे. मला एक खेळाडू दाखवा, जो अवास्तव अपेक्षा आणि दबाव असताना अधिक चांगली कामगिरी करुन दाखवतो. आज, माझे नाव माहीं-द्र आहे, याबद्दल मी कृतज्ञ असल्याचं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

शिवम दुबेही चमकला…

चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 69 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 66 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर शेवटचे चार चेंडू शिल्लक असताना धोनी फलंदाजी आला आणि त्याने 4 चेंडूत 20 धावा केल्या.

गुणतालिकेची काय स्थिती?

मुंबईविरुद्धच्या विजयानंतर चेन्नई गुणतालिकेत 8 गुण आणि +0.726 च्या नेट रनरेटने सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स 4 गुणांसह आठव्या स्थानावर घसरली आहे. आतापर्यंतच्या मोसमात सर्वाधिक 5 विजय नोंदवणारा राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 8-8 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सनराजर्स हैदराबाद 6 गुण आणि +0.344 च्या नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे आणि गुजरातचा नेट रनरेट -0.637 आहे. यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. पंजाबचा नेट रनरेट -0.218, मुंबईचा -0.234 आणि दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट -0.975 आहे. तिन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतक्त्यात तळाच्या 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त 1 जिंकला आहे. बंगळुरुचे 2 गुण आहेत.

संबंधित बातम्या:

रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट…; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!

सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न

टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts