Joe Root Scored Century on Ashes Day 1 ; WTC Final च्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने आणले जमिनीवर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बर्मिंगहम : ऑस्ट्रेलियाने WTC Final मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. या यशानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हवेत होता. पण त्यांना जमिनीवर आणण्याचे काम आता इंग्लंडच्या संघान चोख बजावले आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी जो रुटने शतक करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे कच्चे दुवे सर्वांसमोर आणले आहेत.इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अॅशेस मालिकेला सुरुवात झाली. पण या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडने टॉस जिंकला आणि त्यांचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टोक्सचा हा निर्णय किती योग्य होता हे इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आणि कसोटीमध्ये वनडे स्टाइल फलंदाजीचा नमुना त्यांनी पेश केला. इंग्लंडला बेन बकेटच्या रुपात २२ धावांवर असताना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर सलामीवीर झॅक क्रॉवली आणि ऑली पोप यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागदारी रचली. पण त्यानंतर ऑलीला नॅथन लायनने बाद केले आणि इंग्लंडला दुसरा धक्का बसला. त्यानंतर क्रॉवलीने आपले अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर तो जास्त काळ खेळपट्टीवर टीकू शकला नाही. क्रॉवलीने यावेळी ६२ धावा केल्या. क्रॉवली बाद झाला पण त्यानंतर रुटची दमदार फलंदाजी पाहण्याचा योग चाहत्यांना आला.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस


रुटने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. रुटने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा वरचष्मा कमी करण्याचे काम चोख बजावले, पण दुसरीकडे त्याने इंग्लंडची धावगती चांगली राखण्याचाही यशस्वी प्रयत्न केला. रुटने यावेळी सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ११८ धावांची अप्रतिम खेळी साकारली. इंग्लंडने त्यानंतर आपला पहिला डाव ८ बाद ३९३ या धावसंख्येवर घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ खेळायला आला. ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर ४ षटकांमध्ये बिन बाद १४ अशी स्थिती होती. त्यामुळे इंग्लंडकडून अजूनही ३७९ धावांची दमदार आघाडी आहे.

[ad_2]

Related posts