Neeraj Singh Rathore Arrested In Gujarat For Looting MLAs By Accepting Bribe Maharashtra Nagpur Crime

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Nagpur Crime: महाराष्ट्रातील (Maharashtra Crime) काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गुजरातच्या (Gujrat News) मोरबीमधून (Morbi) अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांच्या नावाचा गैरवापर करत होता. 

गेल्या काही दिवसांत आरोपीनं काही भाजप (BJP) आमदारांना फोन केले होते. आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. 

दरम्यान नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामट्यानं सात मे रोजी संपर्क साधला होता. कुंभारेंना संशय आला, आणि त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या जवळची नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी लेखी तक्रार दिली.

प्रकरण नेमकं काय? 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल हे जरी स्पष्ट नसलं, तरी राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देतो, असं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचा आमिष दाखवणारा भामटा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव घेऊन अशी फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून काल (16 मे) रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून त्याचं नाव नीरज सिंह राठोड आहे. त्यानं गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याची बतावणी केली आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली. 

news reels reels

प्रकरण कसं आलं उघडकीस? 

नीरज सिंह राठोडनं संपर्क केलेल्या आमदारांमध्ये दोन आमदार नागपूर जिल्ह्यातील असून इतर आमदार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याची ही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, नागपूरमध्ये भाजप आमदार विकास कुंभारे यांनाही या भामट्यानं सात मे रोजी संपर्क साधून मंत्रिपद मिळवून देतो अशी बतावणी केली होती. त्यानंतर विकास कुंभारे यांनी त्यासंदर्भातील माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जेपी नड्डा यांच्या जवळची नाही हे स्पष्ट झाल्यानंतर विकास कुंभारे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. 

नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला गुजरातमधील मोरबीमधून अटक केली आहे. लवकरच या भामट्याला नागपुरात आणले जाणार असून त्यानं आणखी किती आमदारांची अशाच पद्धतीनं फसवणूक केली आहे, हे स्पष्ट होईल. दरम्यान, एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, या भामट्यानं गोवा आणि नागालँडमधील काही भाजप आमदारांनाही अशाच पद्धतीची बतावणी करून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या फसवणुकीचं हे प्रकरण आंतरराज्य स्वरूपाचं झालं आहे.

[ad_2]

Related posts