baramati lok sabha supriya sule vs sunetra-pawar will Filing of election Form On 18 th of april In baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभेच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar )आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नणंद – भावजय विरुद्ध जरी ही लढाई असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असणार आहे. 

सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचीदेखील माहिती आहे 

दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील 18 एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार  नामनिर्देश पत्र विकत घेतलं  आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.  यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार डमी उमेदवार?

बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावे पुणे जिल्हाधिकाऱी कार्यालयातून अर्ज खरेदी करण्यात आलाय.  त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे  देखील अर्ज खरेदी करण्यात आलाय.   त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 12  मार्चपासून सुरूवात झाली. अर्ज भरण्याची मुदत 19  एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती कोणाची होणार?

राज्याच्या प्रमुख नेत्यांचं लक्ष बारामती काबीज कऱण्यासाठी लागलं आहे. नणंद भावजय जरी उमेदवारी घेऊन निवणडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरीही खरी लढाई ही काका- पुतण्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारामती नेमकी कोणत्या पवारांची होणार?, हे पाहणं महत्वाचं ठरलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Weather Update : पुणेकरांनो उन्हापासून काळजी घ्या;  दोन दिवसात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवणार

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts