Aamir Khan files case for fake video Never endorsed any political party said Aamir Khan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aamir Khan Viral Video : बॉलिवूडचा “मिस्टर परफेक्शनिस्ट” अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) पोलिसांत धाव घेतली आहे. एका व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा फेक असल्याचे आमिर खानने म्हटले आहे. 

प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओत आमिर खान एका विशष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आमिर खान करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आमिर खानने काय म्हटले?

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानने आज एक अधिकृत निवेदन जारी केले. आमिर खानच्या टीमने त्याच्यावतीने निवेदनात म्हटले की,  आमिर खानने त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन केले नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आमिरने निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. ज्यामध्ये आमिर एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ खोटा असून पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे आमिर खानने म्हटले. 

व्हायरल व्हिडीओबाबत आमिर खानने संबंधित अधिकाऱ्यांकडे, यंत्रणांकडे तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमकडेही तक्रार दाखल केली आहे. सायबर विभागाने एफआयआर दाखल केला आहे. 

आमिर खानचे आवाहन

आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसलो तरी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन आमिर खानने केले आहे. मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहनही आमिर खानने केले आहे. 

आमिरचे कोणते चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर?

आमिर खान हा सलाम वेंकी (Salaam Venky) या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्याशिवाय, सितारे जमीन पर या चित्रपटातही झळकणार आहे. आमिर खानची निर्मिती आणि किरण रावचे दिग्दर्शन असलेला लापता लेडीज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. 
 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts