Shirur Loksabha Constituency amol kolhe critisize adhalrao patil on the basis of development On shirur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शिरुर: शिरूर लोकसभेतील करंदी गावातील एका मतदाराने (Shirur Loksabha Constituency) खासदार अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) घेरलं. गेल्या पाच वर्षात तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं, याचं उत्तर तुम्ही द्यावं. अशी अपेक्षा प्रचारस्थळी केली. तर हाच धागा पकडून महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी कोल्हेना चिमटा काढला. शिरुरमधील सगळ्याच गावात अशीच परिस्थिती आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल तर असा माणासाला मतदान करताना 100 वेळा विचार करावा, असा सल्ला आढळराव पाटलांनी गावकऱ्यांना दिला आहे. आढळराव पाटलांनी आज शिरुर लोकसभा मतदार संघातील अनेक गावात भेटी देत त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

आढळराव पाटील नेमकं काय म्हणाले?

आढळराव पाटील म्हणाले की, करंदी तालुक्यात अमोल कोल्हेंची सभा सुरु होती. ही सभा सुरु असताना अमोल कोल्हेंना एकाने भरसभेत उठून प्रश्न विचारला. आढळारावांनी गावासाठी वेगवेगळ्या योजने अंतर्गत 15 कोटी पाच वर्षात दिले. त्यांचा पराजय करुन अमोल कोल्हेंना गावात लीड दिलं. असं म्हणत अमोल कोल्हेंचं ग्रामस्थांनी भाषण अडवलं. हीच परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल तर असा माणासाला मतदान करताना 100 वेळा विचार करावा, असा चिमटा आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना काढला आहे. 

आढळराव पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ताकद आपल्या पाठीमागे राहणार आहे. राज्यात आपलं सरकार, केंद्रात आपलं सरकार मग मध्येच डोकावणारा दुसरा खासदार कशाला हवा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार आपलं असताना या खासदाराचा उपयोग काय? हा खासदार येऊन पण नेमकं काय करणार?, असे अनेक प्रश्न आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. 

‘लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि ऐशो आरामासाठी खासदार निवडणून द्यायचे नाही तर रात्रंदिवस लोकांसाठी आणि जनतेसाठी उपलब्ध असणारा खासदार हवाय. 15 वर्ष मी तेच केलं आहे. रात्र आपरात्री कामं केली आहे. त्यामुळे असाच खासदार तुम्हाला हवा आहे. तुमची महत्वाची आणि प्राथमिक कामं खासदाराच्या मार्फत होणार नसेल तर या खादारासाचा काहीही उपयोग नसल्याचं’,  आढळराव पाटील म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Amol Kolhe : चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का? अन् कोणी विश्वास ठेवत का?; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर जहरी टीका

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts