abp c voter opinion poll Ahmednagar Lok Sabha Constituency Nilesh Lanke ahead in survey Sujay Vikhe is behind Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP C Voter Opinion Poll : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाची सर्वांचा उत्सुकता लागून आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल (ABP C Voter Opinion Poll) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 30 जागा तर महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळणार असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. 

एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये (Loksabha Election 2024) सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार सध्या अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा (Ahmednagar Lok Sabha Constituency) ओपिनियन पोल समोर आला आहे. 

अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी तगडे आव्हान ठेवले आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे बाजी मारणार की निलेश लंके गुलाल उधळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार अहमदनगरमधून निलेश लंके हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुजय विखे पाटलांना यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

असं आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित

अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचे बोलले जात आहे. कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले होते. यामुळे जर लंके हे यंदाच्या निवडणुकीत आघाडी घेऊ शकतात. 

(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)

आणखी वाचा 

ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts