Maharashtra News Ahmednagar News Attempt To Abduct Girl From Sangamner, Two Arrested

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ahmednagar News : संगमनेर शहरातून (Sangamner) धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ओळख झालेल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संगमनेर शहरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

एकीकडे राज्यातील अनेक भागातील मुलींच्या बाबतीत झालेल्या घटनांमुळे वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून या घटनांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. अशातच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर शहरात मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पोलिसांचा कसून तपास सुरु आहे. 

दरम्यान दोन वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातून मुलीची आरोपींशी ओळख झाली होती. भेटायला आल्यावर पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या फिर्यादीवरुन बिहार राज्यातील अकरम शेख आणि नेमतुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून धर्मांतर की लव्ह जिहाद हे स्पष्ट होणार आहे. याबाबत अद्याप पोलिसांना माहिती दिली नसून तपासानंतर या प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे. 

पब्जी गेमच्या माध्यमातून झाली ओळख 

पीडित मुलगी ही संगमनेर येथील असून ती पब्जी गेम खेळत असताना या माध्यमातून दोघांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे भेटण्याचे ठरले. त्यानुसार मुलगी जेव्हा भेटण्यासाठी गेली. त्यावेळी दोघे जण उपस्थित होते. या दोघांनी मुलीला त्या ठिकाणाहून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक धावून गेले, त्यावेळी संशयितांनी तिथून पळ काढला. सदरचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीकडून संपूर्ण प्रकारची माहिती घेत संशयितांचा माग काढला. त्यानुसार पोलिसांनी बिहारमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. 

हिंदुत्ववादी संघटनाकडून तीव्र संताप 

दरम्यान आज दुपारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार येणार असून पोलीस रिमांडची मागणी करण्यात आली आहे. तर या प्रकरणी शहरातील हिंदुत्ववादी संघटनाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले की, शहरातील 32 मुली संपर्कात असून पोलीस तपासात मात्र तसं काही समोर आलं नाही. आज आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर पुढील तपासाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले आहेत.

[ad_2]

Related posts