Maharashtra Students Aadhar Invalid : राज्यात 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध, प्रकरण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यातील शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 10 मे पर्यंतच्या माहितीनुसार 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आढळली आहेत. त्यामुळे संच मान्यता करण्यासाठीच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार हे 24 लाख 60 हजार विद्यार्थी अतिरिक्त म्हणजेच शाळाबाह्य ठरण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने या सर्व प्रक्रियेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तीस हजार शिक्षकांची नवी भरती त्यांना करायची नाहीये, आणि त्यासाठीच आधी विद्यार्थी बोगस ठरवून आणि त्या आधारे शिक्षक अतिरिक्त ठरवण्याचा उद्योग केला जातोय, आरोप महामंडळाने केला आहे. राज्य सरकार ला ऑगस्ट 2023 मध्ये होऊ घातलेली नवी शिक्षक भरती पुढे ढकलायची आहे असा आरोपही महामंडळाने केला आहे.</p>
<p>&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts