Pakistan Provoke India Before ODI World Cup 2023 ; World Cup सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा माइंड गेम सुरु

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वनडे विश्वचषकाची सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु आहे. पण हा विश्वचषक सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानने माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. कारण आता फक्त एका वाक्यात पाकिस्तानने भारताला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.पाकिस्तानने सुरुवातीला आपण भारतात विश्वचषक खेळण्यासाठी येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर बीसीसीआयने आशिया चषकाच्या आयोजनाच्या मुद्द्यावरून अशी काही चाल खेळली की आता पाकिस्तान भारतामध्ये खेळायला तयार झाले आहे. पण त्यांनी आता भारताच्या एका गोष्टीला विरोध कायम ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा गुजरातमध्ये खेळवण्यात यावा, असे बीसीसीआयला वाटत आहे. पण पाकिस्तानने मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. गुजरतासोडून कुठेही सामना खेळवा, असे पाकिस्तानने बीसीसीआयला कळवले आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तानने हा विश्वचषक सुरु होण्यापूर्वी माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने आता फक्त एका वाक्यात भारतीय संघाला चांगलेच डिवचले आहे.

रिझवानने सांगितले की, ” भारताला पराभूत करणे हे आम्हाला विश्वचषक जिंकण्यासारखे नक्कीच नाही. कारण विश्वचषक जिंकणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. कारण आम्हाला कोणत्या एका देशाला पराभूत करून आनंद मिळवायचा नाही, तर आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे आणि त्यासाठी आम्ही जोरदार तयारी करत आहोत. विश्वचषकात बरेच देश असतात, तसाच आम्हाला भारतही आहे. त्यामुळे भारत हा आम्हाला अन्य देशांसारखाच आहे, कारण आमचे ध्येय हे विश्वचषकाचे आहे. त्यामुळे आम्ही विश्वचषक कसा जिंकू शकतो, याचाच विचार सध्याच्या घडीला करत आहोत.”

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

वनडे विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तानला एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना भारतावर विजय मिळवणे म्हणजे इतिहास रचण्यासारखे असेल. पण पाकिस्तानला फक्त भारतावर विजय मिळवायचा नाही तर त्यांना विश्वचषक जिंकायचा आहे. त्यामुळे त्यांनी या विश्वचषकात भारताला जास्त महत्व दिलेले पाहायला मिळत नाही. पण विश्वचषकातील हा सर्वात मोठा सामना असेल आणि तो कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts