Lok Sabha Election Madhya Pradesh Rajasthan Telangana Chhattisgarh Mizoram Election Latest News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) अद्याप एक वर्षाच्या कालावधी असला तरी त्याचे पडघम आतापासूनच वाजत असल्याचं दिसून येतंय. लोकसभेच्या आधीच मिनी लोकसभा निवडणूक समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. या राज्यांमधील दोन ठिकाणी भाजपचं सरकार आहे तर एका राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. इतर दोन ठिकाणी स्थानिक पक्ष सत्तेत आहेत. 

कर्नाटकातील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप अधिक सावध झाल्याचं दिसून येतंय तर काँग्रेसचा आत्मविश्वास काहीसा वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकसभेआधी होणाऱ्या या पाच राज्यांतील निवडणुकीमध्ये रंगत येण्याची शक्यता असून त्याच्या निकालाचा थेट परिणाम मे 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.

Madhya Pradesh Election Update: मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा, लोकसभेच्या 29 जागा 

मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. या ठिकाणचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा कालावधी 6 जानेवारी 2024 रोजी संपणार असल्याने या राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये खासदारांची संख्या ही 29 इतकी आहे. यापैकी 28 ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले आहेत तर एका ठिकाणी काँग्रेसचा खासदार जिंकला आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्यातरी भाजपचे पारडं वरचढ असल्याचं मानलं जातं. 

मध्य प्रदेशमध्ये 2018 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 114 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. कमलनाथ मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केलं आणि सहा मंत्री आणि 22 आमदार फुटून भाजपकडे गेले. त्यामुळे कमलनाथ सरकार पडलं. या 28 जागांपैकी 19 ठिकाणी भाजप निवडून आलं तर 9 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे आधी 109 जागा जिंकलेल्या भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळालं. सध्या भाजपचे शिवराज चौहान मुख्यमंत्री आहेत. 

Rajasthan Election Update: राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199, लोकसभेच्या 25 जागा 

2018 साली झालेल्या निवडणुकीत राज्यस्थानमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 73 जागा जिंकला आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात एकदा बंडही केलं होतं. 

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये सर्वच्या सर्व जागा म्हणजे 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम राहणार की काँग्रेस त्यावर मात करणार हे येत्या सहा महिन्यात समजेल. 

Chhattisgarh Election Update: छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा, लोकसभेच्या 11 जागा 

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा असून 2018 साली त्यापैकी 68 ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला होता. तर भाजपला अवघ्या 15 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे यंदाही काँग्रेसचे पारडं जड असल्याचं चित्र आहे. 

छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा असून त्यापैकी 9 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत, तर दोन ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला आहे. 

Telangana Election Update: तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आणि लोकसभेच्या 17 जागा 

तेलंगणा विधासभेच्या 119 जागा असून त्यापैकी 88 जागांवर भारत राष्ट्र समितीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी 21 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला या राज्यात केवळ एकच जागा मिळाली आहे. पण एकच आमदार असलेल्या या राज्यात भाजपने लोकसभेच्या मात्र 4 जागा जिंकल्या आहेत. 

तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बीआरएसने 9 जागी विजय मिळवला आहे, तर भाजप आणि काँग्रेसला अनुक्रमे चार आणि तीन जागा मिळाल्या आहेत. 

Mizoram Election Update: मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा, विधानसभेच्या 40 जागा

मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांपैकी 26 जागी मिझोराम नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आहे. तर पाच जागांवर काँग्रेसने आणि एका जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. 

मिझोराममध्ये लोकसभा मतदारसंघाची संख्या एकच असून या ठिकाणी मिझोराम नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आहे. 

 

[ad_2]

Related posts