Mangal Gochar 2023 Mars will enter Leo Difficult times will begin for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती आणि योद्धा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, 01 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ उच्च स्थानावर असतो त्यांना धैर्य, शक्ती, परिश्रम इत्यादी क्षेत्रात यश मिळते. 

दरम्यान मंगळ गोचरमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घेऊया, मंगळाच्या संक्रमणादरम्यान कोणत्या राशीच्या व्यक्तींना सतर्क राहावं लागणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांवर मंगळाच्या गोचरचा अशुभ प्रभाव पडू शकतो. या दरम्यान, उत्पन्नाच्या क्षेत्रात नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी यामुळे या राशींच्या व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चांमध्ये अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

कन्या रास

मंगळाच्या गोचरचा या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत अपेक्षित प्रमोशन मिळणार नाही. तुमचं मन थोडं अस्वस्थ राहणार आहे. बिझनेसच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल नाहीये. तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पत्नीच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. व्यवसायामध्ये नुकसान झेलावं लागण्याची शक्यता आहे. 

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी मंगळ गोचरचा काळ कठीण असणार आहे. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना पैशाचे नुकसान सहन करावं लागणार आहे. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल म्हणता येणार नाही. व्यवसायात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक कलहाची चिन्हं दिसून येताय. तुम्हाला तुमच्या बोलण्याचा संयम ठेवावा लागेल. तुमचं कोणाशी तरी भांडण होऊ शकते.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts