Sludge Was Removed From River In Ratnagiri Kokan Maharashtra Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 Ratnagiri River News:  गेल्या काही वर्षांपासून कोकणातील (Kokan) अतिवृष्टीचे प्रमाण हे वाढतच चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोकणवासियांचे प्रचंड नुकसान देखील होते. विशेष करुन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या दुथडी भरुन वाहतात. त्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. पण आता या नद्या मोकळा श्वास घेत वाहणार आहेत कारण गेल्या वर्षापासूनच या नद्यांमधील गाळ बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे या नद्या आता स्वच्छ होणार आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणची वशिष्ठी, संगमेश्वरची शास्त्री, रत्नागिरीची बावनदी, लांजा मधील चांदोराईची काजळी नदी आणि राजापूरमधील अर्जुना नदी या नद्या नेहमीच चर्चेत असतात. कोकणातल्या दऱ्याखोऱ्यातील सह्याद्रीच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील लोकांचे नुकसान देखील होते. या नद्या तालुक्यातील मुख्य बाजारपेठेतून, शहरातून वाहतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास या नद्यातील पाणी नदीपात्रा बाहेर येऊन नदीकाठच्या बाजारपेठा, शहरात आणि महामार्गावर येते. 

आलोरे यांत्रिकी विभागाने या पाचही नद्यातील गाळ बाहेर काढला आहे. सुरुवातीला एकूण तीन टप्प्यात गाळ उपासण्याचे नियोजन करण्यात आले.  पहिल्या टप्प्यात वाशिष्ठी नदीमधील राज्यभरातील यंत्रसामुग्री लावून गाळ उपसा करण्यात आला. एकूण 8 लाख घनमीटर गाळ मागील वर्षी बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले असल्याने पाण्याला योग्य दिशा मागील वर्षीच्या पावसाळ्यात मिळाली होती. अलोरे यांत्रिकी विभागाने यंत्रसामुग्री लावून तब्बल 10 लाख 90 हजार घनमीटर गाळ बाहेर काढत नद्या गाळमुक्त केल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी नद्यांनी धारण केले होते रौद्ररुप

दोन वर्षांपूर्वी चिपळूणच्या वशिष्ठी नदीला अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. त्यावेळी पुराचे पाणी शहरात शिरल्याने संपूर्ण चिपळूण जवळपास 14 तास पाण्याखाली होतं. त्यामुळे चिपळूणकरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरम्यान अर्जुना नदीच्या महापुरामुळे राजापूर बाजारपेठांचं देखील नुकसान झालं होतं. तर  काजळी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीपात्रीतील पाणी बाहेर आल्यामुळे तेथील दळणवळणाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तर संगमेश्वरची शास्त्री नदी धोका पातळी ओलांडून वाहू लागली होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील शास्त्री पूल वाहतुकीसाठी काही तास बंद ठेवण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे प्रशासानाने गेल्या वर्षीपासूनच या नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम सुरु केले होते. त्याबरोबरच या  नद्यांची रुंदी, खोली आणि नद्यांतील प्रवाहातील येणारे अडथळे दूर केल्याने या पाचही नद्या या पावसाळ्यात मोकळा श्वास घेऊन पाहणार आहेत.

पुढे काही किलोमीटरच्या अंतरावरती गेल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील भाऊ नदी या भाऊ नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे नदी धोकादायक स्थितीत वाहत असल्यामुळे या ठिकाणची ही वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली. या सर्वांचा प्रत्यय दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाला आल्यानंतर प्रशासनानं यावेळी मात्र पावसाळा संपल्या नंतर गेल्या वर्षी पासूनच या पाचही प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा करण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू केले.त्याबरोबरच या पाचही नद्यांची रुंदी,खोली आणि नद्यांतील प्रवाहातील येणारे अडथळे दूर केल्याने या पाचही नद्या या पावसाळ्यात मोकळा श्वास घेऊन पाहणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Agriculture News: पेरलेला भात उगवेल का? कोकणातील बळीराजा चिंतेत, पाऊस नसल्यानं शेतीचं कामं खोळंबली

[ad_2]

Related posts